Monday, December 4, 2023
Homeगुन्हेगारीआमदार महेश लांडगे यांच्याकडे ३० लाखांच्या खंडणीची मागणी..

आमदार महेश लांडगे यांच्याकडे ३० लाखांच्या खंडणीची मागणी..

पुण्यातील माजी नगरसेवकांना खंडणी मागण्याचे प्रकरण ताजे असताना आता पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष आणि भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे हेल्पलाइन नंबरवर संदेश पाठवून ३० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

भाजप आमदार महेश लांडगे यांची नागरिकांच्या मदतीसाठी ‘परिवर्तन’ या नावाची हेल्पलाइन आहे. मंगळवारी सायंकाळी या हेल्पलाइन नंबरवर एक संदेश आला. त्यामध्ये ३० लाख रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणी न दिल्यास मारण्याची धमकी देखील देण्यात आली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments