Friday, September 29, 2023
Homeताजी बातमी'दख्खनचा राजा जोतिबा' मालिका बंद करण्याची मागणी… ग्रामस्थ व पुजा-यांचा कथानकावर आक्षेप

‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिका बंद करण्याची मागणी… ग्रामस्थ व पुजा-यांचा कथानकावर आक्षेप

३० ऑक्टोबर २०२०,
दख्खनचा राजा जोतिबाच्या महात्म्यावर आधारित ‘दख्खनचा राजा जोतिबा’ ही मालिका तूर्तास वादात सापडली आहे. जोतिबा डोंगरावरील ग्रामस्थ व पुजा-यांनी या मालिकेच्या कथानकावर आक्षेप घेत ही मालिका त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे. जोतिबा मंदिरापुढे निदर्शने करत, जोतिबा डोंगरावरील ग्रामस्थ व पुजा-यांनी जोतिबाचे सरपंच राधा बुणे यांच्याकडे निवेदन सोपवले. या निवेदनात मालिकेत दाखवल्या जात असलेल्या चुकीच्या गोष्टींवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सत्यकथा दाखवा अन्यथा मालिका बंद करा, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

दख्खनचा राजा जोतिबाचा चुकीचा इतिहास दाखवत भक्तांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत ही मालिका तातडीने बंद करावी या मागणीसाठी जोतिबा डोंगरावरील पुजाऱ्यांनी मंदिरासमोर जोरदार निदर्शने केली .

दख्खनचा राजा जोतिबा’ ही मालिका महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजनची निर्मिती आहे. या मालिकेचे चित्रीकरण सुरु झाल्यावर सुरुवातीला ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला होता. जोतिबाचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला कळेल, जोतिबाची महती घरोघरी पोहोचेल, याबद्दल सगळेच आनंदात होते. प्रत्यक्षात मालिका सुरु झाल्यानंतर मात्र ग्रामस्थांचा भ्रमनिरास झाली. मालिकेत अनेक चुकीच्या घटना असल्याचा आरोप गुरव समाजातील पुजा-यांनी केला आहे. हा प्रकार जोतिबा भक्तांच्या भावना दुखावणारा असल्याचा आरोपही पुजा-यांनी केला आहे.

या मालिकेत अनेक चुकीच्या गोष्टी दाखविल्या असून ही मालिका बंद करावी अशी मागणीही होऊ लागली आहे. चुकीची माहिती दाखवून भावना दुखावल्याल्याने आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सरपंच राधाताई बुणे यांना निवेदन दिलं आहे. सत्यकथा दाखवा अन्यथा मालिका बंद करा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. कोठारे प्रोडक्शनवर कारवाई करा अशी मागणी गुरव समाजाने केली आहे. मालिकेची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून गुन्हा नोंद करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या मालिकेचे चित्रीकरण कोल्हापुरात सुरू आहे. त्यासाठी कोल्हापुरातील चित्रनगरीमध्ये मोठा सेट उभारण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments