दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ग्लोबल सेलिब्रिटिजचे ट्विटरयुद्ध सुरु आहे. पण शेतकरी आंदोलनाबाबत ट्वीट म्हणजे भारताविरोधातील एक विचारपूर्वक रचण्यात आलेला कट असल्याचं दिसून आलं आहे. त्याचे काही पुरावेही मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर भारताविरोधात प्रचार केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी ग्रेटा थनबर्गविरोधात FIR दाखल केली आहे. ग्रेटा थनबर्ग ही पर्यावरणाशी संबंधित मुद्दे उचलून धरण्यासाठी प्रसिद्ध आहे.
ग्रेटाने नुकतंच केलेल्या एका ट्वीटमुळे भारताविरोधात कॅम्पेनिंग राबवण्याबाबतचा एक पूर्ण अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. त्यात पोएटिक जस्टिस फाऊंडेशनचंही नाव समोर आलं आहे. ही फाऊंडेशन म्हणजे कॅनडामधील एक NGO आहे.
वाचाः कंगनाला ट्विटरचा झटका, आक्षेपार्ह ट्विट हटवले; वाचा सविस्तर
भारताविरोधात प्रचार करण्यासाठी जो अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे त्याचं एक गूगल डॉक्यूमेंट समोर आला आहे. त्याचबरोबर याचीही माहिती मिळाली आहे की, ट्विटर स्ट्रोम क्रिएट करण्यासाठीच रिहानाचं एक ट्वीट आलं होतं. दरम्यान, ग्रेटाने दोन अॅक्शन प्लॅन तयार केले आहेत. एका प्लॅनमध्ये 26 जानेवारीपर्यंतच्या कॅम्पेनिंगची माहिती देण्यात आली होती. ग्रेटाने हे ट्वीट 3 फेब्रुवारीला केलं होतं. आणि नंतर ते डिलीट केलं. 4 फेब्रुवारीला ग्रेटाने पुन्हा एक ट्वीट केलं, त्यात नव्याने तयार करण्यात आलेला प्लॅन होता.