वन अधिकारी दीपाली चव्हाण मृत्यू प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपाली यांचा गर्भपात केल्या प्रकरणी विनोद शिवकुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल क्षेत्रात कार्यरत RFO (परिक्षेत्र अधिकारी) दीपाली चव्हाण यांनी 25 मार्च रोजी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणात वरीष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांच्यावर दीपालीने मृत्यपूर्वी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप करत आत्महत्येला जबाबदार म्हटले होते.
त्यामुळे 25 मार्च रोजीच DFO विनोद शिवकुमार यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा 306 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. धारणी पोलिसांनी वेगाने तपास करत आहे. शिवकुमार याने दीपालीला जंगलात फिरवल्याने तिचा गर्भपात झाला, असं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
त्यामुळे शिवकुमार यांच्या गुन्हात वाढ करून 312,504,506 चे गुन्हे आणखी दाखल करण्यात आले आहे. दीपाली चव्हाण यांनी मृत्यपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत माझा गर्भपात झाला होता, असं तिने म्हटलं होतं. त्यामुळे त्या दृष्टीने देखील धारणी पोलिसांनी तपास करत गुन्ह्यात वाढ केली आहे.