Tuesday, December 5, 2023
Homeताजी बातमीजगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘अलंकरण समारोह’ संपन्न

जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘अलंकरण समारोह’ संपन्न

पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ चिखली (Chikhali) येथे संचालक हभप राजू महाराज ढोरे, संचालिका डॉ. स्वाती मुळे, प्रभारी मुख्याधापिका स्नेहल पगार यांच्या मार्गदर्शनाखाली अलंकरण समारोह संपन्न झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे, महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा संतपीठाचे सचिव संजय नाईकडे, उपस्थित होते.

प्रभारी मुख्याधापिका स्नेहल पगार यांनी ‘नेतृत्व कसे असावे’ याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. मतदान पद्धतीने शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी पुढील विद्यार्थी नेत्यांची निवड करण्यात आली.

विद्यार्थी नेता श्लोक जाधव, विद्यार्थिनी नेता स्वरा सोनवणे, विद्यार्थी उपनेता प्रतिक बग, विद्यार्थिनी उपनेता सिया वेताळ, शिस्त सचिव नेहा गिरप, संस्कृतिक सचिव सौम्य जगताप, संघनायक पृथ्वी कृष्णा व्यवहारे, संघनायक अग्नी कार्तिक मोरे, संघनायक जल पुर्वा क्षीरसागर, संघनायक वायू धनुश्री वरनिया यांची निवड करण्यात आली.

संस्कृती व दर्जेदार शिक्षण या दोघांचा संगम म्हणजे संतपीठ, असे मत संजय नाईकडे यांनी व्यक्त केले. संतपीठ शाळेमधून शिक्षण घेऊन बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी भारत देशाचा चांगला नागरिक घडेल, असे राजेंद्र अहिरे यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सूत्रसंचालन प्राथमिक विभाग शिक्षिका धनश्री पाटील व निलम ठेसे यांनी केले. पूर्व प्राथमिक विभागाच्या समन्वयिका मयुरी मुळूक यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments