१० एप्रिल २०२१,
पिंपरी चिंचवड शहरात आज दि १० एप्रिल २०२१ रोजी २०७२ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील २२३९ तर शहराबाहेरील १५५जणांचा समावेश आहे. आज मागील २४ तासात कोरोनामुळे २३ जणांचा मृत्यू झाला.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १६५३६७ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १३७९२४ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २१५८ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे १० पुरुष – चिंचवड (५५, ८६ वर्षे), आकुर्डी (४७ वर्षे) चिखली (६४,६८ वर्षे) थेरगाव (७०, ६२ वर्षे) पिंपरी (६१ वर्षे) वाकड (४३ वर्षे), दिघी (६४ वर्षे), ०९ स्त्री चिखली (४३ वर्षे) पिंपरी (६१, ६९ वर्षे) निगडी (६५ वर्षे) चिंचवड (८६,५७,४५,४५ वर्षे) सांगवी (७५ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०५ पुरुष- चंदननगर (६३ वर्षे) खडकी (६५ वर्षे) डेक्कन (७२ वर्षे) बाणेर (७७ वर्षे) हंडेवाडी (५७ वर्षे) ०४ स्त्री – कात्रज (५९ वर्ष) हिंजवडी (६२ वर्षे) पुणे (४७ वर्षे) केंदुर (५५ वर्षे) येथील रहिवासी आहे.
टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ०८ मृत्यु झालेले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी रुग्णालय झोन निहाय कोविड – १९ बाधित रुग्ण संख्या
अ.क्र | रुग्णालय झोन | कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या | अ.क्र | रुग्णालय झोन | कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या |
१ | आकुर्डी | २११ | ५ | तालेरा | २०९ |
२ | भोसरी | ४४५ | ६ | थेरगाव | ३५२ |
३ | जिजामाता | ३७१ | ७ | यमुनानगर | २३२ |
४ | सांगवी | ३२३ | ८ | वायसीएम | ९६ |
प्रभाग निहाय कोविड – १९ बाधित रुग्ण संख्या | |||||
अ.क्र | प्रभाग | कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या | अ.क्र | प्रभाग | कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या |
१ | अ | २४५ | ५ | इ | २६१ |
२ | ब | ३४७ | ६ | फ | २६३ |
३ | क | २७५ | ७ | ग | २४७ |
४ | ड | ३७४ | ८ | ह | २२७ |
वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.