Friday, June 13, 2025
Homeताजी बातमीस्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीचा अभ्यासिकेत मृत्यू ; हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूची शक्यता

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीचा अभ्यासिकेत मृत्यू ; हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूची शक्यता

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात देशभरातून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत असतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अभ्यासाचा मोठा तणाव विद्यार्थ्यांवर असतो. नुकतेच पुण्यात याच तणावातून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर आता पुण्यातील वडगाव शेरी येथील श्री. स्टडी सेंटर या अभ्यासिकेत अभ्यास करत असताना एका तरुणीचा हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पूजा वसंत राठोड (वय २५) असं मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पूजा ही मूळची सोलापूर जिल्ह्यातील कोंडी तांडा या गावातील आहे. पूजाचे बीएससी पर्यंतचे शिक्षण हे संगमेश्वर येथे झाले तर पदव्युत्तर शिक्षण पुण्यात झाले. पूजा पुण्यात टाटा कन्सल्टिंग सर्विसेसमध्ये नोकरी करत होती. नोकरी करत असताना पूजा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास देखील करत होती. पूजाची लहान बहीण देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करते, तर भाऊ बंगळरु येथील एका कंपनीत नोकरी करतो.

मंगळवारी पूजा पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील श्री. स्टडी सेंटर या अभ्यासिकेत अभ्यास करत होती. अचानक तिला हृदयविकाराचा झटका आल्याने ती जागेवरच कोसळली. त्यानंतर अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी पूजाला मृत घोषित केलं. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. पूजाला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना अभ्यासिकेतील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. काल बुधवारी पूजा राठोड हिचे मुळगाव असलेल्या कोंडी तांडा येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अतिशय हुशार आणि होतकरु असलेल्या पूजाच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments