Monday, December 4, 2023
Homeगुन्हेगारीपुण्यातील अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालयातील डिनला 16 लाखाच्या लाचप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

पुण्यातील अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालयातील डिनला 16 लाखाच्या लाचप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

पुणे महानगरपालिका Pune Municipal Corporation (PMC) वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालयातील (PMC Medical College) अधिष्ठाता (डिन) आशिष श्रीनाथ बनगिनवार Dr Ashish Shrinath Banginwar (54, पद – अधिष्ठाता) यांना 16 लाख रूपयाच्या लाचेतील पहिला हप्ता म्हणून 10 लाख रूपयाची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष बनगिनवार यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचा मुलगा एनईईटी परिक्षा – 2023 मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एमबीबीएसच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कॅप राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालय, पुणे येथे इन्स्टिटयुशनल कोटा मधून निवड झाली होती. या निवड यादीचे आधारे तक्रारदार हे आशिष बनगिनवार (डिन) यांना मुलाच्या एमबीबीएसच्या महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेसाठी भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी बनगिनवार यांनी दरवर्षाची शासनमान्य विहीत फी 22 लाख 50 हजार रूपये व्यतिरिक्त प्रवेशासाठी 16 लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी आशिष बनगिनवार यांनी तक्रारदार यांच्या मुलाचे एमबीबीएसच्या प्रवेशासाठी तडजोडीअंती 16 लाख रूपये लाच म्हणून मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 10 लाख रूपये बनगिनवार यांनी त्यांच्याच कार्यालयात घेतले. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सरकारी पंचासमक्ष त्यांना रंगेहाथ पकडले आहे.

त्यांच्याविरूध्द समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पुण्याच्या अ‍ॅन्टी करप्शनचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे ,अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती पोलिस उप अधीक्षक नितीन जाधव यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments