मागील कित्येक वर्षांपासून दयाबेन तारक मेहता शोमधून गायब आहे. दयाबेन पुन्हा कधी येणार याची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. आता दयाबेकच्या कमबॅकबाबत अपडेट समोर आली आहे.
टेलिव्हिजनवरील पॉप्युलर शो तारक मेहता का उल्टा चश्मामधून दयाबेन मागील कित्येक वर्षांपासून गायब आहे. दयाबेन अहमदाबादला गेली तर येण्याचं नाव नाही. सहा वर्षांपूर्वी तिने शोला रामराम केला होता. इतक्या वर्षांपासून दयाबेन शोमध्ये कमबॅक कधी करणार अशी चर्चा आहे. दयाबेन नसल्याने शोचे अनेक चाहते नाराज असून दयाबेनच्या कमबॅकची अनेकांना प्रतिक्षा आहे. आता ही प्रतिक्षा संपणार असल्याची चर्चा आहे.
अनेक चाहत्यांना दयाबेन अर्थात अभिनेत्री दिशा वकानीला पुन्हा एकदा शोमध्ये, गोकुळधाम सोसायटीमध्ये पाहायचं आहे. चाहत्यांची प्रतिक्षा लवकरच संपणार असून आता दयाबेन पुन्हा शोमध्ये कधी येणार याबाबत काही अपडेट समोर आले आहेत. शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये दयाबेन शोमध्ये परतणार असल्याची तारीख रिव्हिल करण्यात आली आहे.
सोमवारच्या एपिसोडमध्ये मिळाली माहिती?
नुकत्याच झालेल्या सोमवारच्या एपिसोडमध्ये दया अहमदाबादवरुन कधी येणार हे जाणून घेण्याचं जेठालालने ठरवलं असल्याचं दाखवण्यात आलं. पण सुंदरलाल जेठालालच्या प्रश्नाचं उत्तर देताना टाळाटाळ करताना दिसतो. सुंदरलालने उत्तर देण्यासाठी एक प्लॅन केला जातो. या प्लॅनमध्ये जेठालाल फसतो पण त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. सोमवारच्या एपिसोडमध्ये सुंदरने दयाबेन शोमध्ये कधी येणार याची माहिती दिली.
दिवाळीत होणार दयाबेनचं कमबॅक?
तारक मेहता का उल्टा चश्मा शोमध्ये यंदाची दिवाळी अधिक खास असणार आहे. दिवाळीत दयाबेन गोकुळधाम सोसायटीमध्ये परत येणार असल्याची माहिती आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये सुंदरलालने त्याची बहीण अर्थात दयाबेन दिवाळीच्या दिवशी परत येणार असल्याचं म्हटलं आहे. आता शोमध्ये दयाबेन म्हणून दिशा वकानीच परत येणार की कोणी दुसरी अभिनेत्री दयाबेनच्या भूमिकेत दिसणार याबाबत कोणतीही माहिती नाही.
मागील १४ वर्षांपासून तारक मेहता शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. २०१७ पर्यंत दिशा वकानी दयाबेनची भूमिका साकारत होती. दिशा वकानीने ९ वर्ष दयाबेन पात्र साकारलं. आपल्या भूमिकेने तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यानंतर ती प्रसूती रजेवर गेली. शो सोडून सहा वर्ष झाली तरी अद्याप दिशा शोमध्ये दिसली नाही. आता दयाबेन पुन्हा शोमध्ये येणार असल्याची चर्चा असून अनेक प्रेक्षकांमध्येही आनंदाचं वातावरण आहे.