Tuesday, March 18, 2025
Homeताजी बातमीअजित पवारांकडून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन.. स्वत:चा राखीव सूट अमित शाहांना मुक्कामासाठी...

अजित पवारांकडून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन.. स्वत:चा राखीव सूट अमित शाहांना मुक्कामासाठी दिला..

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सध्या अमित शाह अहमदनगरमधील प्रवरानगर मध्ये आहेत. तर, आज सायंकाळी ते पुण्यात दौऱ्यावर येणार आहेत. आज आणि उद्या अमित शाह पुण्यात असतील. अमित शाहांचा पुण्यातील मुक्काम व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये असेल. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांचा राखीव सूट दिला मुक्कामासाठी अमित शाहांना देत महाराष्ट्राची राजकीय संस्कृती किती समृद्ध आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.

अजित पवारांनी स्वत:हून सूट दिला
अजित पवार यांनी स्वत: साठी राखीव असलेला सूट गृहमंत्र्यांसाठी दिला आहे. अमित शाह यांच्या कार्यालयानं खासगी ठिकाणी मुक्कामाची सोय नको असं जिल्हा प्रशासनाला कळवलं होतं. पुण्यातील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये दोन सुट आहेत त्यापैकी एक सुट कायमस्वरूपी मुख्यमंत्र्यांना राखीव असतो. तर,दुसरा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासाठी राखीव असतो. अजित पवार याच दालनात अजित पवार बैठक घेत असतात. मात्र, अमित शाह यांच्या कार्यालयाकडून खासगी हॉटेलमध्ये मुक्काम नको हे कळवल्यावर ही गोष्ट अजित दादांच्या कानावर जाताच त्यांनी त्यांचा सूट अमित शहांना मुक्कामासाठी दिलाय.

गृहमंत्री अमित शाहांचा मुक्काम अजित पवारांच्या ‘सूट’मध्ये,
खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हीव्हीआयपी सर्किट हाउसमध्ये त्यांच्या ताब्यातील सूट उपलब्ध करून दिलाय. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असल्याने हा सूट त्यांना देण्यात येतो. अजित पवार दर शुक्रवारी, शनिवारी याच ठिकाणी बैठका घेतात.

सहकार मंत्री झाल्यावर अमित शाह पहिल्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना केल्यानंतर त्याची जबाबदारी अमित शाह यांच्याकडे देण्यात आली. अमित शाह यांनी केंद्रीय सहकार मंत्रालयाची जबाबदारी स्वीकरल्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments