Monday, December 4, 2023
Homeगुन्हेगारीबनावट डेबिट कार्ड (क्लोन) करून सायबर चोरट्यांनी केली भारती सहकारी बँकेची एक...

बनावट डेबिट कार्ड (क्लोन) करून सायबर चोरट्यांनी केली भारती सहकारी बँकेची एक कोटी रुपयांची फसवणूक

पुण्यातील भारती सहकारी बँकेची सायबर चोरट्यांनी १ कोटी ८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. चोरट्यांनी डेबिट कार्डचे क्लोन करून ही फसवणूक केली आहे.

बँक खातेदारांची बनावट डेबिट कार्ड (क्लोन) करून सायबर चोरट्यांनी भारती सहकारी बँकेची एक कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर चोरट्यांनी मुंबई, पुणे, दिल्लीसह, सांगली, सोलापूर, कोल्हापूर येथील एटीएम केंद्रातून बनावट डेबिट कार्डचा वापर करून खातेदारांचे पैसे चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.

याबाबत भारती सहकारी बँक लिमिटेडचे कार्यकारी संचालक सर्जेराव जगन्नाथ पाटील (वय ६२) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भारती सहकारी बँकेची मुख्य शाखा सदाशिव पेठेत आहे. सायबर चोरट्यांनी डिसेंबर २०२० ते २०२१ या कालावधीत बनावट डेबिट कार्ड (क्लोन) तयार करून पुण्यातील सदाशिव पेठ, धनकवडी, धानोरी, आकुर्डी, कोथरुड, बाणेर, हडपसर, नवी मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, इस्लामपूर, मुंबईतील वरळी, तसेच दिल्लीतील एटीएम केंद्रातून भारती सहकारी बँकेच्या खात्यातून एक कोटी आठ लाख १५ हजार ७०० रुपये लांबविले. सायबर चोरट्यांनी फसवणूक करण्यासाठी ४३९ बनावट डेबिट कार्डचा वापर केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

बनावट एटीएम कार्डद्वारे १२४७ व्यवहार करण्यात आले आहेत. कॉसमॉस बँकेच्या सर्व्हर यंत्रणेवर सायबर हल्ला करून कॉसमॉस बँकेची एकूण मिळून ९४ कोटी ४२ लाख रुपयांची रक्कम चोरल्याची घटना ऑगस्ट २०१८ मध्ये घडली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments