Friday, September 20, 2024
Homeगुन्हेगारीमोदी आडनावावरून केलेली टीका राहुल गाधींना पडली महागात… राहुल गांधींना दोन वर्षाची...

मोदी आडनावावरून केलेली टीका राहुल गाधींना पडली महागात… राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा, सुरत न्यायालयाचा निर्णय

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना सुरत येथील कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. मानहानी प्रकरणात कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. मोदी नावावर टीका केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात सुरत कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर टीका करताना म्हटले होते की, सर्व चोरांची नावे मोदी कशी काय?, कोर्टाने शिक्षा दिल्यानंतर गांधी यांनी तातडीने जामीनासाठी अर्ज देखील केला आणि न्यायालयाने त्यांची शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित देखील केली.

२०१९ मध्ये कर्नाटच्या कोलार येथे आयोजित सभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या आडनावावरून टीका केली होती. सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. याविरोधात गुजरातमधील भाजपाचे माजी आमदार तथा माजी मंत्री पुरनेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. गेल्या आठवड्यात याप्रकरणी सुनावणी पार पडली होती. आज याप्रकरणी न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

दरम्यान, आज राहुल गांधी स्वत: सुरत न्यायालयात हजर होते. यावेळी त्यांनी ”मी नेहमी भ्रष्टाचाराविरोधात बोलतो. मी कोणाच्या विरोधात मुद्दामहून बोललो नाही. यामुळे कोणाला नुकसान झालेले नाही”, असे न्यायालयाला सांगितलं. मात्र, न्यायालयाने त्यांना भादंविच्या कलम ५०४ अन्वये दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावणी तसेच त्यांना जामीनही मंजूर केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments