Saturday, March 2, 2024
Homeमहाराष्ट्रऐन लग्नात कोयता गँगची दहशत, पंगतीतून दुचाकीने फिरण्यास मनाई केल्याने नवरदेवावर कोयत्याने...

ऐन लग्नात कोयता गँगची दहशत, पंगतीतून दुचाकीने फिरण्यास मनाई केल्याने नवरदेवावर कोयत्याने वार

हळदी समारंभानंतर पंगतीतून दुचाकीवर ये-जा करण्यास मनाई केल्याने तिघांनी नवरदेवावर कोयत्याने वार केले. कोयता फिरवून दहशत निर्माण करत ‘आम्ही येथील भाई आहोत, आमच्या नादाला लागाल तर तुमची विकेट टाकीन’ अशी धमकी दिल्याचा प्रकार चिंचवडमध्ये घडला.

या प्रकरणी विजय राहुल तलवारे (वय २२, रा. काळेवाडी) सनी राजीव गायकवाड (वय २३, रा. पिंपरी), अनिकेत बापू बनसोडे (वय २४, रा. पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत रोहित प्रकाश गायकवाड (वय २९, रा. श्रीनगर, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहित यांचा हळदी समारंभ शुक्रवारी सायंकाळी झाला. त्यानंतर वऱ्हाडी जेवायला बसले. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून पंगतीमध्ये ये-जा करीत होते. त्यांना मनाई केल्याने रोहितसोबत बाचाबाची करून आरोपी निघून गेले. थोड्या वेळाने कोयता व गज घेऊन आले. रोहित यांचा मामेभाऊ शक्ती बनसोडे याच्यावर विजयने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रोहितने शक्तीला बाजूला ढकलले. रोहितच्या हातावर वार बसला. त्यामुळे ते जखमी झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments