१५ जानेवारी २०२१,
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड -१९ वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी शासनानकडून कोविड-१९ लसीकरण दि.१६ जानेवारी २०२१ पासून सुरू करण्याबाबत सुचना प्राप्त झालेल्या आहेत. सदरची लस आरोग्य सेवा देणा-या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना प्राधान्याने देण्यात येणार आहे.
शासनाच्या सुचनेनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून खालील ८ ठिकाणी कोविड -१९ लसीकरण होणार
१) यमुनानगर रुग्णालय,
२) नवीन जिजामाता रुग्णालय,
३) नवीन भोसरी रुग्णालय,
४) वाय.सी.एम.रुग्णालय,
५) पिंपळे निलख दवाखाना,
६) कासारवाडी दवाखाना,
७) तालेरा रुग्णालय
८) ईएसआयएस रुग्णालय
अशी ०८ लसीकरण केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. या ठिकाणी आरोग्य सेवा देणा-या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांचे लसीकरण होणार आहे.
कोविड-१९ लसीकरणाचा शुभारंभ दि.१६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी-१०.३० वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयामध्ये मा.महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे अध्यक्षतेखाली व मा.उपमहापौर, मा.सभापती, स्थायी समिती, मा.सत्तारुढ पक्षनेता, मा.विरोधी पक्षनेता, मा.गटनेता शिवसेना, मनसे, अपक्ष आघाडी, नगरसदस्य/नगरसदस्या मा.आयुक्त व मा.अतिरिक्त आयुक्त यांचे उपस्थितीमध्ये आयोजीत करण्यात आलेला आहे.