Saturday, March 22, 2025
Homeताजी बातमीपुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचा आदेश…

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचा आदेश…

सार्वजनिक शौचालय पाडल्याप्रकरणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायालयाने दिले होते. त्या आदेशाला पुणे सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पौड रोड परिसरातील भीमनगर मध्ये डी पी रस्त्याचे काम सुरू आहे. तिथे असलेल्या दोन स्वच्छतागृहांपैकी पैकी एक स्वच्छतागृह पाडण्यात आले.त्यामुळे परिसरातील नागिरीक स्वछतागृहाच्या सुविधेपासून वंचित राहत असल्याचं सांगत महापौरांवर कारवाईची मागणी देविदास ओव्हाळ या ज्येष्ठ नागरिकाने केली होती. ओव्हाळ यांची तक्रार गृहीत धरत नायलयाने महापौरांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते.

महापौर मुरलीधर मोहोळ (रा. मयूर कॉलनी, कोथरूड), ठेकेदार वसंत चव्हाण (रा. भुसारी कॉलनी, कोथरूड) आणि ठेकेदार राहुल शिवाजी शिंदे (रा. भुसारी कॉलनी, कोथरूड) आणि एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने कोथरूड पोलिसांना दिले आहेत.

या घटनेत तक्रारकर्ते देविदास भानुदास ओव्हाळ हे पौड फाटा येथील शीलाविहार कॉलनीमध्ये रहिवासी आहेत. ते राहता असलेल्या भागातील सार्वजनिक स्वच्छतागृह वापरता येऊ नये, नागरिकांनी घर सोडून दुसरीकडे राहण्यास जावे, या हेतूने महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काही व्यक्तींच्या मदतीने २० ऑक्टोबर रोजी स्वच्छतागृहाचे दरवाजे काढून टाकले, असा आरोप करण्यात आला होता.

दरम्यान या आरोपात कोणतंहीतथ्य नसल्याचा दावा महापौरांनी केला आहे. या ठिकाणी जावेद शेख नावाच्या व्यक्तीचं बांधकाम आहे. त्यावर कारवाई होऊ नये, म्हणून त्यांनी ओव्हाळ यांच्यामार्फत तक्रार दाखल केली. महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना आपल्या विरोधात संगनमताने कट रचण्यात आल्याचा आरोप महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments