Sunday, June 15, 2025
Homeअर्थविश्वबोगस ‘बँक गॅरंटी’ देणा-या सेक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीवर कारवाई करा :...

बोगस ‘बँक गॅरंटी’ देणा-या सेक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीवर कारवाई करा : तुषार कामठे

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत रस्ते सफाईचा ठेका मिळवण्यासाठी सेक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीने बोगस ‘बँक गॅरंटी’ सादर करुन महानगरपालिका आणि संबंधित बँकेचीही मोठी फसवणूक केली असल्याचा आरोप भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांनी पत्रकार परिषदेत केला. गुरुवारी (दि. १३ जानेवारी) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कामठे यांनी सांगितले की,

महानगरपालिका ‘अ’ आणि ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत रस्ते, गटर सफाईच्या निविदेतून तब्बल ५५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप यापूर्वीच मी सर्वसाधारण सभेत पुराव्यानिशी उघड केला होता. संबंधित सेक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट ठेकेदार संस्थेने इंदापूर नगरपरिषद आणि तुळजापूर, जि. उस्मानाबाद येथील मुख्याधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करुन अनुभव कागदपत्रे आणि बोगस लेटरहेड सादर केल्याचे पुराव्यानिशी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच याबाबत महापालिका दक्षता समिती काय तपास करते ? असा सवालही कामठे यांनी उपस्थित केला होता. अद्यापही महापालिका प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. याबाबत शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पुढील आठवड्यात भेट घेऊन सर्व पुरावे असणारी कागदपत्रे देणार आहोत.

यावेळी कामठे म्हणाले की, सेक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीकडून बोगस बँक गॅरंटी सादर केली आहे. या विषयी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मुंबई येथील फोर्ट शाखेचे बँक मॅनेजर उल्गनाथन व्ही. यांनी तसे लेखी पत्र नगरसेवक कामठे यांना दिले आहे. BG nos. SBILG00004731679020 आणि SBILG00004731679019 या दोन्ही बँक गॅरंटी बनावट आहेत. अशा कोणत्याही बँक गॅरंटी बँक प्रशासनाने दिलेल्या नाहीत, असा लेखी खुलासा बँकेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे सेक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीने महापालिका प्रशासनाची मोठी फसवणूक केली आहे.

इंदापूर नगर परिषद, तुळजापूर नगर परिषदेचे बनावट कार्यादेश, बोगस स्वाक्षरी करुन सादर केल्याचे पुरावे सादर केले आहेत. आता महापालिका प्रशासन आणि आयुक्त राजेश पाटील यांनी कायदेशीर कारवाई करावी आणि महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही तुषार कामठे यांनी केली आहे.तसेच पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे सादर करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी लेखी मागणी करणार आहोत, असेही नगरसेवक कामठे यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments