२५ डिसेबंर,
पिंपरी येथे उभारण्यात आलेल्या भीमसृष्टी प्रकल्पामध्ये मनुस्मृती दहनाचा प्रसंग वगळल्याच्या निषेधार्थ शहरातील सर्व पुरोगामी संघटनांनी एकत्र येऊन आज मनुस्मृतीचे दहन केले.
आंबेडकर पुतळा चौकात हा कार्यक्रम घेण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारुती भापकर, नगरसेविका सुलक्षणा धर, गिरीश वाघमारे, नकुल भोईर, प्रदीप पवार, विष्णू मांजरे, विजय गेडाम, संतोष जोगदंड, धम्मराज साळवे, ॲड. लक्ष्मण रानवडे, विजय जगताप, सिद्धीकभाई शेख, श्याम घोडके, अजीज शेख आदी यावेळी उपस्थित होते.
बाबासाहेबांच्या जीवनामधील एक ऐतिहासिक व महत्त्वाचा प्रसंग म्हणून मनुस्मृती दहन या सामाजिक क्रांतीच्या घटनेला इतिहासात विशेष महत्त्व आहे. मात्र सत्ताधारी भाजपने जाणिवपूर्वक हा प्रसंग भीमसृष्टीतून वगळला असल्याचे मानव कांबळे यांनी नमूद करून जोपर्यंत या प्रसंगाचे शिल्प उभे राहात नाही तोपर्यंत हा निषेध व मनुस्मृती दहन केलेच जाईल असे त्यांनी म्हटले.
मारुती भापकर यांनी याविषयी पालिका प्रशासन, सत्ताधारी पदाधिकारी तसेच या प्रकल्पाच्या उद्घाटनाला आलेले केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना सांगूनही या महापालिकेचे लबाड आयुक्त हे शिल्प उभारत नसल्याचे सांगितले.सिद्धीकभाई शेख यांनी आभार मानले.