२जूलै २०२१,
आषाढी वारीसाठी आज आळंदीतून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. मात्र तत्त्पूर्वी प्रशासनासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे. प्रस्थान सोहळ्याला उपस्थित असलेल्या ३६८ वारकऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यातील ३७ वारकऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आळंदी प्रस्थान सोहळ्यावर कोरोनाचं सावट पहायला मिळत आहे. काल 22 वारकऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यात आता अजून १५ जणांची भर पडली आहे, तशी माहिती पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे यांनी दिली,
यंदाही गतवर्षीप्रमाणेच आषाढी वारी सरकारच्या वतीने घालून दिलेल्या नियमावलीत पार पडणार आहे. माऊलींच्या चलपादुका विशेष वाहनाने पंढरपूरला नेल्या जाणार आहेत.
प्रस्थान कार्यक्रम 2 ते 24 जुलै वारी सोहळा
पहाटे 4 ते 5.30 : घंटानाद, काकडा, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती
सकाळी 9 ते 11 : वीणा मंडपात कीर्तन
दुपारी 12 ते 12.30 : गाभारा स्वच्छ करणे, समाधीस पाणी घालणे व महानैवेद्य
सायंकाळी 4 : प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ
सायंकाळी 6 : माऊलींचा सोहळा मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून आजोळघरी मुक्कामी
प्रस्थानानंतर 3 ते 19 जुलै : आजोळघरी माऊलींच्या पादुकांवर परंपरेनुसार सर्व नैमित्तिक उपचार
19 जुलै : माऊलींच्या चलपादुका सकाळी 10 वाजता एसटी बसने पंढरपूरकडे मार्गस्थ
19 ते 24 जुलै : माऊलींच्या पादुका पंढरपूरमध्ये मुक्कामी
24 जुलै : पौर्णिमेला काला समाप्तीनंतर पंढरपूरहून आळंदीकडे एसटी बसने परतीचा प्रवास