देशात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. शुक्रवारी गेल्या २४ तासात वर्षातील सर्वाधिक रूग्ण सापडले असल्याचे दिसून आले आहे. दिवसभरात देशात तब्बल २३ हजार २८५ नवे कोरोनाबाधित सापडले असून ही एका दिवसातली सर्वात मोठी रुग्णसंख्या आहे. त्यामुळे देशभरातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता १ कोटी १३ लाख ८ हजार ८४६ इतका झाला आहे. याआधी गेल्या वर्षी २४ डिसेंबर रोजी देशात २४ तासांमध्ये २४ हजार ७१२ नवे करोनाबाधित सापडले होते.
गेल्या २४ तासांमध्ये देशात ११७ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १ लाख ५८ हजार ३०६ इतका झाला आहे. भारताचा रिकव्हरी रेट देखील खाली उतरला असून आता तो ९६.८६ टक्के इतका आहे. देशात सध्या १ लाख ९७ हजार २३७ अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण असून एकूण सापडलेल्या करोनाबाधितांपैकी हा आकडा १.७४ टक्के इतका आहे. तर देशाचा मृत्यूदर १.४० टक्क्यांवर स्थिर आहे.