राज्य सरकारने कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. यात शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. विकेंड लॉकडाऊन शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता सुरु होत असून तो सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत असणार आहे. तसेच सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
विकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरू, काय बंद
फक्त अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय आस्थापना कर्मचारी संचारबंदीमधून हॉस्पिटल, मेडिकल शॉप्स, इन्शुरन्स कार्यालय, औषध विक्रेते व कंपन्या, वैद्यकीय सेवेशी संबंधित घटक सुरू राहणार आहेत.
रेल्वे, टॅक्सी, ऑटो, सार्वजनिक बस सेवा 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. खाजगी वाहने, खाजगी बसेस बंद राहतील.
स्थानिक स्वराज्य संस्थेची मान्सूनपूर्व कामे, मालवाहतूक, कृषी संबंधित सेवा, ई-कॉमर्स, मान्यताप्राप्त मिडिया यांनाही संचारबंदी मधून वगळण्यात आले आहे. या सेवा 24 तास सुरु राहतील.
रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स फक्त फूड होम डिलिव्हरी सुविधा सुरू राहतील असे सांगण्यात आले आहे.
मोकळ्या जागांवरील उपक्रम मनोरंजन पार्क, बगीचे, प्रेक्षागृहे, सार्वजनिक मैदाने पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. दुकाने, मार्केट, मॉल्स (अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळून) बंद राहतील.
पिंपरी चिंचवड शहरातील एमआयडीसी परिसरातील सर्व कारखाने शनिवारी-रविवारी पूर्ण क्षमतेने सुरू राहतील.


