राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्यात गर्दी टाळण्यासाठी दिवसा जमावबंदी, तर रात्री संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला असून 30 एप्रिलपर्यंत हे नियम लागू राहतील असे आदेश देण्यात आले आहेत. राज्यासह पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातही कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रण याबाबतचे सुधारित आदेश जाहीर करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. शहरातील अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
महापालिका आयुक्तांचे सुधारित आदेश खालील प्रमाणे..
1.पिंपरी चिंचवड संपुर्ण कार्यक्षेत्रासाठी कलम १४४ लागू करणेत येत आहे.
2.सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७:०० ते संध्याकाळी ०६:०० वाजेपर्यंत पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करणेत येत आहे.
3.या व्यतिरीक्त (सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ०६:०० ते सकाळी ०७:०० व शुक्रवार संध्याकाळी ०६:०० ते सोमवार सकाळी ०७:०० वाजेपर्यंत) वैध कारणांशिवाय किंवा वैध परवानगी शिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी सर्व व्यक्तींना मनाई करणेत येत आहे.
4.वैद्यकीय आणि इतर जीवनावश्यक सेवांना सूट देण्यात आलेली असुन त्यांचे वाहतुकीला निबंध असणार नाहीत.
जीवनावश्यक सेवेत यांचा समावेश असेल
-रुग्णालये, निदान केंद्रे, दवाखाना, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा.
-सार्वजनिक वाहतुक – रेल्वे, टॅक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बस,
-पिंपरी चिंचवड महागरपालिकेचे मान्सून पूर्व उपक्रम
-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवा
-वस्तुंची वाहतुक
-मान्यताप्राप्त माध्यम सेवा
-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापनांतर्गत अत्यावश्यक सेवा म्हणून नियुक्त केलेल्या सेवा
-सर्व कुरीअर / कार्गो सेवा
-डेटा सेटर्स, क्लाउड सर्व्हिसेस सबंधी सेवा ।
-पायाभूत सुविधा आणि महत्वाच्या सेवांना आधार देणारी आयटी सेवा.
-सरकारी व खाजगी सुरक्षा यंत्रणा