Wednesday, May 14, 2025
Homeआरोग्यविषयकधक्कादायक! जव्हारमध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसह एकदम ५१ जणांना कोरोनाची लागण

धक्कादायक! जव्हारमध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसह एकदम ५१ जणांना कोरोनाची लागण

कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. यातच आता पालघरमधील जव्हार तालुक्यात कोरोनाचा भडका उडालेला दिसून आला आहे. येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक व केंद्रीय स्वयंपाक गृहातील कर्मचारी वर्गाला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत एकूण ७२ रुग्ण आढळून आले आहेत.

तालुक्यातील हिरडपाडा शासकीय आश्रमशाळेतील ३७ विद्यार्थी, तीन शिक्षक व आदिवासी विकास विभागाचे विनवळ येथील सरकारी केंद्रीय स्वयंपाक गृहात काम करत असलेले १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याचबरोबर जव्हार नगर परिषद हद्दीतही नऊ रुग्ण आढळून आले. या रुग्णांना किरकोळ लक्षणे असून यातील काही रूग्णांना विक्रमगड येथील रिव्हेरा कोरोना उपचार केंद्रात हलविण्यात आले आहे.

तालुक्यातील हिरडपाडा येथील अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता दहावी ते बारावी वर्गात शिकत असलेल्या नऊ विद्यार्थ्यांना एकाच वेळी ताप, सर्दी, खोकला येत असल्याने डॉक्टरांना संशय आला. त्यांची प्रतिजन तपासणी केली असता सर्वांना बाधा झाल्याचे आढळून आले. तातडीने आश्रमशाळेतील विद्यार्थी व हिरडपाडा गावातील नागरिकांची तपासणी करण्यात आली, त्यात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी असे ४० रुग्ण आढळले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments