Tuesday, October 13, 2026
Homeआरोग्यविषयकचिंता वाढली: महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची उच्चांकी नोंद, एकाच दिवशी पंचवीस हजार रूग्ण

चिंता वाढली: महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची उच्चांकी नोंद, एकाच दिवशी पंचवीस हजार रूग्ण

महाराष्ट्राच्या चिंतेत भर पाडणारी बातमी आहे. कारण महाराष्ट्राने आतापर्यंतचा सर्वांत जास्त कोरोना रूग्ण सापडण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. गुरूवारी (१९ मार्च) सायंकाळी आलेल्या आकडेवारीने कोरोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच रुग्णसंख्येची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाल्याचे दिसून आले. राज्यात १७ सप्टेंबर २०२० रोजी २४,८८६ इतकी उच्चांकी नोंद झाली होती. तर काल राज्यात २५ हजार ८३३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.

राज्यात फेब्रवारीपासून अचानक रुग्णसंख्या वाढायला लागली. सुरूवातीला दिवसाला ४ ते ५ हजाराच्या सरासरीने रुग्ण आढळून येत होते. फेब्रुवारी अखेरपर्यंत रुग्णसंख्या दहा हजारांच्या काठावर पोहचली. तर मार्च मध्यापर्यंत महाराष्ट्रात २० ते २४ हजारांच्या सरासरीने दररोज रुग्ण आढळून येत आहे. कोरोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून आले आहेत. चोवीस तासांत तब्बल २५ हजार ८३३ लोकांना करोनाची लागण झाली असून ५८ जणांचा मृत्यू झाला, तर १२ हजार १७४ जणांनी या आजारावर मात केली. गेल्या २४ तासांत नागपूरमध्ये सर्वाधिक ४५२३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून त्याखालोखाल मुंबईत २८७७, पुण्यात २७९१, औरंगाबादला एक हजार २७४, पिंपरी-चिंचवड १२७२ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबई, पुणे, नागपूर या महत्त्वाच्या शहरांसह राज्यातील इतरही शहरात करोनाचा उद्रेक झाला आहे. प्रत्येक शहरात दररोज रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असून, प्रशासनाकडून निर्बंध वाढवले जात आहे. राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक शहरांमध्ये नाईट कर्फ्यू, अंशतः लॉकडाउन आणि कडक लॉकडाउन आदी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments