कोरोनामुळे मरणारी माणसं जगायच्या लायकीची नाहीत असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. कोरोना हा रोग नाही असंही ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी कोरोना निर्बंधावरुनही टीका केली. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.
“मुळात कोरोना हा रोग नाही. कोरोनाने माणसं मरतात ती जगण्याच्या लायकीची नाहीत. कोरोना हा रोग नाही,” असं संभाजी भिडेंनी म्हटलं आहे. तसेच यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या निर्बंधांवरुन टीका करताना म्हटलं की, “दारुची दुकानं उघडी. त्यांना परवानगी दिली आहे. पण कोणी काही विकत बसला आहे त्याला पोलीस काठ्या मारतात. काय चावटपणा चालला आहे. हा नालायकपणा, मूर्खपणा चालला आहे”.