Monday, May 11, 2026
Homeताजी बातमीपंकजा मुंडे यांच्या विषयी वादग्रस्त पोस्ट ,सकाळपासून पाथर्डी बंद

पंकजा मुंडे यांच्या विषयी वादग्रस्त पोस्ट ,सकाळपासून पाथर्डी बंद

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी एका तरुणाने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने बुधवारी रात्री पाथर्डी तालुक्यातील शिरापूर गावात तणाव निर्माण झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ मुंडे समर्थकांनी शुक्रवारी पाथर्डी बंदची हाक दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी सकाळपासूनच दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

शिरापूर येथील तरुण महेश दत्तात्रय शिंदे यांनी पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकली होती. त्यामुळे शेकडो युवक संतप्त झाले. ते बुधवारी रात्री पाथर्डी पोलीस ठाण्यात जमा झाले. त्यांनी वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्याकडे केली. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे पोलिसांनी आश्वासन दिले. त्यानंतर सर्व युवक शिरापूर येथे गेले. युवक शिरापूरला गेल्याचे समजतात पोलीसही गावात गेले. वादग्रस्त पोस्ट ठेवल्याच्या निषेधार्थ अमोल गरजे, मुकुंद गरजे, रणजीत बेळगे, अर्जुन घायतडक, अक्षय शिरसाट, विठ्ठल बडे, भाऊसाहेब शिरसाठ, संदीप आव्हाड, संजय शिरसाठ, आदींनी पोलिसांना निवेदन दिले. याप्रकरणी महेश शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments