Wednesday, November 11, 2026
Homeमहाराष्ट्रफिंगरप्रिंट विश्लेषण आणि समुपदेशनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; धाराशिवचे सचिन कसबे पुरस्काराने सन्मानित

फिंगरप्रिंट विश्लेषण आणि समुपदेशनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; धाराशिवचे सचिन कसबे पुरस्काराने सन्मानित

पुण्यात ‘भारत आदर्श गौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२६’ प्रदान; हजारो विद्यार्थी, पालक आणि व्यावसायिकांना केले मार्गदर्शन

व्यक्तिमत्त्व विकास, सुप्त गुणांची ओळख आणि योग्य करिअर निवडीसाठी फिंगरप्रिंट विश्लेषण व समुपदेशनाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणारे धाराशिव तालुक्यातील वाघोली गावचे सचिन रघुनाथ कसबे यांना ‘भारत आदर्श गौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. पुणे येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या राजवाडे हॉलमध्ये रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘आदर्श राष्ट्र गौरव सन्मान सोहळा २०२६’ आयोजित करण्यात आला होता. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पार पडलेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. राष्ट्र भूषण न्यूज आणि ग्रेट पीपल सोशल फाउंडेशन यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सचिन कसबे हे फिंगरप्रिंट विश्लेषक आणि समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. फिंगरप्रिंट ॲनालिसिस अर्थात बोटांच्या ठशांच्या विश्लेषणासह ब्रेन मॅपिंग आधारित समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी, पालक आणि विविध व्यावसायिकांना मार्गदर्शन केले आहे. व्यक्तीची आवड, क्षमता, कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्वातील वैशिष्ट्ये समजून घेऊन त्यांना योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने ते काम करतात.

विशेषतः विद्यार्थ्यांना स्वतःमधील सुप्त गुण ओळखण्यास, शैक्षणिक प्रगतीसाठी योग्य दिशा निवडण्यास आणि करिअरविषयक निर्णय घेण्यास त्यांनी मदत केली आहे. याशिवाय पालकांना मुलांच्या क्षमता समजून घेण्यासाठी, कौटुंबिक प्रश्नांवर मार्गदर्शन मिळवण्यासाठी तसेच व्यावसायिकांना त्यांच्या कौशल्यांनुसार पुढील वाटचाल ठरवण्यासाठी त्यांनी समुपदेशन केले आहे. या माध्यमातून त्यांनी हजारो लोकांपर्यंत आपले मार्गदर्शन पोहोचवले आहे.

केवळ शैक्षणिक यशापुरते मर्यादित न राहता प्रत्येक व्यक्तीमधील क्षमता आणि कौशल्यांना योग्य व्यासपीठ मिळावे, या दृष्टिकोनातून कसबे यांचे कार्य सुरू आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

वाघोलीसारख्या ग्रामीण भागातून पुढे येत आपल्या कार्याच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करणाऱ्या सचिन रघुनाथ कसबे यांच्या या सन्मानामुळे धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या यशाबद्दल परिसरातून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments