निगडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक(Akurdi) शंकर बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना पुणे-मुंबई महामार्गावर खंडोबा माळ येथील ग्रेड सेपरेटर मध्ये मंगळवारी सकाळी कंटेनर अडकला. याबाबत माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अडकलेला कंटेनर बाहेर काढून घेत वाहतूक सुरळीत करण्यात आली.
निगडी-पिंपरी या लेनवर हा कंटेनर अडकला. ग्रेड सेपरेटरची उंची कमी असल्याने व्हेहिकल कॅरीअर सातत्याने ग्रेड सेपरेटरमध्ये अडकतात. त्यामुळे ग्रेड सेपरेटर पूर्वी ग्रेड सेपरेटरची उंची, त्यातून किती उंची पर्यंतची वाहने जाऊ शकतील याबाबत सूचना फलक लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मंगळवारी सकाळी अडकलेल्या कंटेनरमुळे जुन्या महामार्गावर लांब पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. एका लेनवर कंटेनर अडकल्याने कमी जागेतून वाहतूक सुरु होती. त्यामुळे अनेकांना बराच वेळ या कोंडीमध्ये अडकून पडावे लागले.