Tuesday, February 27, 2024
Homeताजी बातमीबहुसदस्यीय प्रभाग पध्दतीमुळे संविधानाची पायमल्ली- देवेंद्र तायडे

बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीमुळे संविधानाची पायमल्ली- देवेंद्र तायडे

२३ सप्टेंबर २०२१,
पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरासह पुढील वर्षात राज्यातील अनेक महानगरपालिका आणि नगरपालिका, नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. यामध्ये मुंबई वगळता इतर सर्व ठिकाणी बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीने निवडणूका घेण्यात येणार आहेत. असा निर्णय बुधवारी राज्याच्या कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. हा निर्णय म्हणजे संविधानाची पायमल्ली असून या निर्णयाला वंचित बहुजन आघाडीचा विरोध असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी दिली आहे.

बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीने निवडणूका घेणे म्हणजे, ‘एक मत – एक मुल्य’ हि संकल्पना संविधानाने दिली आहे याची पायमल्ली होत आहे. महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय राजकीय हेतूने घेतलेला निर्णय आहे. तीन सदस्यांचा एक प्रभाग केल्यास तो पुर्ण प्रभाग आरक्षित करणार आहेत का? प्रभाग पध्दतीत प्रभागाला आरक्षण देण्याऐवजी उमेदवाराला आरक्षण दिले जाते. याला वंचित बहुजन आघाडी विरोध करणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र लढा उभारु आणि या महाविकास आघाडी सरकारची हि राजकीय खेळी आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.

एखाद्या प्रभागात एस. सी ; एस. टी. मतदारांची संख्या जास्त असेल तर तो पुर्ण प्रभाग आरक्षित करणार का फक्त एखादी जागा आरक्षित करणार याचा देखिल खुलासा निवडणूक आयोगाने व महाविकास आघाडी सरकारने करावा. तसेच मुंबईसाठी वॉर्ड पध्दत आणि इतर महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपरिषदांसाठी बहुसदस्यीय प्रभाग पध्दत म्हणजे मुंबई काय महाराष्ट्राच्या बाहेर आहे का? याचाही खुलासा सरकारने करावा असेही वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments