२२ डिसेंबर २०२०
पिंपरी चिंचवड शहरात आज दि २२ डिसेंबर रोजी ९८ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील ९६ तर शहराबाहेरील २ जणांचा समावेश आहे.आज मागील २४ तासात कोरोनामुळे शुन्य जणांचा मृत्यू झाला.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९५५६३ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९२०८३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७३७ जणांचा मृत्यू झालेला आहे.
वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.