Sunday, March 23, 2025
Homeगुन्हेगारीमहाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता पुण्यात SRPF च्या २ तुकड्या दाखल…

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता पुण्यात SRPF च्या २ तुकड्या दाखल…

शहरात कुठे ही कायदा सुव्यवस्था बिघडली तर या तुकड्यांना पाचारण करण्यात येणार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हा निर्णय घेतल्याची पुणे पोलिसांनी माहिती दिलीये. सध्या रोज एका ठिकाणी आंदोलन, मोर्चे, कुणाचं ना कुणाचं कार्यालय फोडणं हे सत्र सुरु आहे. या सगळ्या गदारोळात आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे पुण्यात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता 2 एसआरपीएफ च्या तुकड्या दाखल झालेल्या आहेत. पुणे पोलिस आयुक्तालयात या दोन्ही तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. शहरात कुठे ही कायदा सुव्यवस्था बिघडली तर या तुकड्यांना पाचारण करण्यात येणार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हा निर्णय घेतल्याची पुणे पोलिसांनी माहिती दिलीये.

महाराष्ट्रातील राजकारणासाठी येणारे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे पत्र पाठवले आहे. उद्याच बहुमत सिद्ध करण्यास देखील सांगितले आहे. बंडखोर आमदार गुवाहाटीला असतानाच शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांची कार्यालये फोडली. कुणी बंडखोर आमदारांच्या समर्थानार्थ तर कुणी विरोधात मोठी आंदोलनं केली त्यामुळे आता जेव्हा बहुमत चाचणीत सहभागी होण्यासाठी हेच बंडखोर आमदार मुंबईत दाखल होतायत तेव्हा त्यांनी आपल्या मुक्कामाचं ठिकाणी सुद्धा सुरक्षेच्या कारणास्तव गुप्त ठेवलेलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments