Saturday, March 2, 2024
Homeताजी बातमी'पत्रकार ज्या पद्धतीनं विरोधकांना प्रश्न विचारतात ते लोकशाहीत नाही हुकुमशाहीत विचारले जातात'-...

‘पत्रकार ज्या पद्धतीनं विरोधकांना प्रश्न विचारतात ते लोकशाहीत नाही हुकुमशाहीत विचारले जातात’- काँग्रेस खासदार राहुल गांधी

६ ऑक्टोबर २०२१,
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीला रवाना होण्यापूर्वी राजधानी दिल्लीत एका पत्रकार परिषदेद्वारे आपलं म्हणणं मांडलं. यादरम्यान त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधतानाच मीडियावरही टीका केली. ‘माध्यमं आपली जबाबदारी विसरलेत, माध्यमांकडून विरोधकांनाच उलट प्रश्न विचारले जातात’, असं यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलंय.

विरोधकांचं कामच सरकारवर दबाव टाकण्याचं आहे. आम्ही लखीमपूर खीरीला जाऊन केवळ सरकारवर दोषींविरुद्ध कारवाईसाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण इथं शेतकऱ्यांसोबत चुकीचं घडतंय, असं त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हटलंय.पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी आपल्याला प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मीडियावरही निशाणा साधला. ‘हे तुमचं काम आहे. तुम्ही लोक तर ते करत नाहीत. उलट विरोधकांना प्रश्न विचारले जातात. ही तुमचीदेखील जबाबदारी आहे. ती तुम्ही विसरला आहात. ज्या पद्धतीनं तुम्ही विरोधकांना प्रश्न विचारत आहात, ते लोकशाहीत नाही तर हुकूमशाहीत विचारले जातात’, असं म्हणत राहुल गांधींनी माध्यमं आपली जबाबदारी विसरल्याचा आरोप केला.

‘तुम्ही लोक आम्हाला प्रश्न विचारता परंतु, तुम्ही स्वत:चं काम आणि जबाबदारी विसरला आहात. देशाच्या संवैधानिक पायावर सरकारनं कब्जा मिळवलाय. तुम्हाला हे माहीत आहे की मीडियाला कशा पद्धतीनं नियंत्रित केलं जातं. देशात अगोदर लोकशाही होती, आज इथं हुकूमशाही नांदतेय. मीडिया आपलं काम करत नाही त्यामुळे आम्ही ते काम करतोय. राजकीय नेते आता उत्तर प्रदेशला भेटही देऊ शकत नाहीत’, असं म्हणत राहुल गांधी यांनी मीडियाला फटकारलं.

प्रियाका गांधी यांची अटक आणि त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून देण्यात आलेल्या वागणुकीविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी ‘प्रियांका यांना कैदेत ठेवण्यात आलंय परंतु, हा काही मोठा मुद्दा नाही. हा मुद्दा शेतकऱ्यांचा आहे’, असं म्हटलंय.

प्रियांकांना मारहाण किंवा जबरदस्तीनं कोणताही फरक पडणार नाही. तुम्ही आमच्यासोबत काहीही केलं तरी त्यानं आता फरक पडणार नाही. आम्हाला मारा, गाडा, आमच्यासोबत चुकीचं वर्तन करा… आम्हाला काहीही फरक पडणार नाही. आम्ही याची ट्रेनिंग घेतलीय. कित्येक वर्षांपासून ही ट्रेनिंग आमच्या कुटुंबातूनच आम्हाला सुरू आहे. हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे, आम्ही तो उचलत राहणार, असंही राहुल गांधींनी म्हटलंय.

जे मारतात ते बाहेर मोकळेपणानं फिरतात, परंतु, पीडित आणि त्यांना पाठिंबा देणारे तुरुंगात धाडले जातात, असं म्हणत त्यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केलीय. आज राहुल गांधी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यासोबत लखनऊसाठी रवाना होत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments