विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज शनिवारी (१३ मे) होणार आहे. मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष काँग्रेसच्या बाजूचे असले तरी ते खरे ठरतात की मतदार दुसऱ्यांदा भाजपालाच संधी देऊन सलग एकाच पक्षाकडे सत्ता न देण्याची राज्यातली ३८ वर्षे जुनी परंपरा खंडीत करतात, याबद्दल उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक निकालाच्या प्रत्येक अपडेट्सचा आढावा…
कर्नाटक विधानसभेच्या सुरुवातीच्या कलात काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. काँग्रेस 116 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 76 जागांवर आघाडीवर आहे.काँग्रेस-भाजपमध्ये चुरस वाढली आहे. काँग्रेसने आघाडीचं शतक गाठलं.राज्याच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे काही कल हाती आले आहेत. जवळपास 200 हून अधिक जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. विशेष म्हणजे बेळगावमधील 18 जागांपैकी 14 जागांवर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर भाजप चार जागांवर आघाडीवर आहे. बेळगावमध्ये काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. कल सारखे कमी जास्त होत आहेत. मात्र, सध्या मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस आघाडीवर असून भाजप पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.
कर्नाटक विधानसभा निकालाचे सुरुवातीचे कल जाहीर होताच, बंगळुरूत काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष, पक्षाचा झेंडा फडकावत घोषणाबाजी