पत्रकार परिषदेद्वारे संजय राऊत यांनी राज्यातला विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या राज्यातील नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. संजय राऊत यांनी सर्वात आधी शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांचा समाचार घेतला.संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रातला आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात झाला. हा घोटाळा तब्बल २५ हजार कोटी रुपयांचा होता. फडणवीसांच्या काळात खूप घोटाळे झाले, पण त्यातला सर्वात मोठा घोटाळा महाआयटीत झाला. या घोटाळ्याशी संबंधित अमोल काळे कोण आहे? विजय ढवंगाळे कोण आहे? त्यांना कुठं लपवलंय ते त्यांनी सांगावं. महाआयटीतल्या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रं, सर्वांचे अकाऊंट्स, त्यांच्या लिंक्स, त्यांचे मनी ट्रान्झॅक्शन्स, विना टेंडर कोणाकोणाला कंत्राटं दिली? कोणाला किती रुपये दिले? याची माहिती येत्या दोन दिवसात ईडीकडे दिली जाईल, असा इशारा राऊत यांनी दिला.”
‘..तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील!’
दरम्यान, संजय राऊत म्हणाले की, “भाजपचे काही प्रमुख लोकं मला तीनदा भेटले. वारंवार मला हेच सांगितलं की तुम्ही या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा. कोणत्याही परिस्थिती आम्हाला हे सरकार घालवायचं. आमची सगळी तयारी झालेय. काही आमदार आमच्या हाताला लागलेत. तुम्ही बाहेर पडा. आम्हाला मदत करा. आम्ही राष्ट्रपती राजवट आणू. म्हटलं हे कसं शक्य आहे? याच्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही जर मदत केली नाही, तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील! टाईट करतील हा शब्द त्यांनी वापरल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय.”
पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडशी किरीट सोमय्या यांचे संबंध आहेत. सोमय्यांचा मुलगा तर या मास्टरमाइंडच्या कंपनीत डायरेक्टर आहे. त्यांनी निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभे केले आहेत. त्यांना पर्यावरणाच्या परवानग्या नाहीत. हरित लवादानं एक्शन घेतली तर त्यावर कारवाई होईल.. आदित्य ठाकरेंना माझं आवाहन आहे, की याची ताबडतोब चौकशी करून निल सोमय्या आणि किरीट सोमय्या यांना अटक करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडच्या अकाऊंटमधून भाजपला 20 कोटींचा निधी गेला असल्याचा दावा ही संजय राऊत यांनी केला आहे.
ईडी वाले सुनो. सीबीआयवाले सुनो.सगळ्यांनी ऐका जरा माझं. हा जो किरीट सोमय्या आहे, हा एक फ्रॉड आहे. त्यांनं बँक घोटाळा केलाय. लोकांचे पैसे बुडवलेत. तर मी विचारतो की, निकॉन इन्फ्रा कंन्स्ट्रक्शन कंपनी कुणाची? तर किरीटची.. नील सोमय्याची. आणि हा राकेश वाधवानचा पार्टनर आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.
वाधवानला ब्लॅकमेल केलं
मौजे गोखिवरे वसईत यानं तिथं एक प्रोजेक्ट केलाय. वाधवानला यांनीच ब्लॅकमेल केलं. आणि त्याला लुबाडलं. आपल्या फ्रंटमॅनच्या नावे व्यवहार केले. कॅशही घेतली. 100 कोटी घेतले. लधानीच्या नावावर त्यांनी जमिनी घेतल्या. 400 कोटी रुपयांची जमीन फक्त 4.4 कोटी रुपयांनी केली. अशा वेगवेगळ्या जमिनी घेतल्या. या कंपनीचा डायरेक्ट आहे नील किरीट सोमय्या. निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभारले जात आहेत. पर्यावरणाच्या परवानग्या नाही, हरित लवादानं एक्शन घेतली तर त्यावर कारवाई होईल. आदित्य ठाकरेंना माझं आवाहन आहे, की याची ताबडतोब चौकशी करून निल सोमय्याला अटक करा, असं आवाहन राऊत यांनी केलं.
मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी
मुळात पीएमसी घोटाळ्यातील आरोपीनं सोमय्याच्या जवळच्या माणसाला का जमीन विकली? आणि हा भ्रष्टाचाराविरोधात लढणारा माणूस आम्हाला ज्ञान देतोय, आम्हाला अक्कल शिकवतोय. एकीकडे भ्रष्टाचारविरोधाची भजनं करायची आणि दुसरीकडे भ्रष्टाचार करायचा. देवेंद्र लधानी हा सोमय्याचा फ्रंटमॅन आहे.. त्याच्या नावे व्यवहार केले जात आहेत. याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
ईडीच्या कार्यालयात दही खिचडी
पीएमसीचा तपास ईडी करतेय. हे सगळे कागद ईडीकडे पाठवले आहेत. सोमय्यांच्या भ्रष्टाचाराचे कागद किमान तीन वेळा ईडीत पाठवलेत. तुम्ही एक दोन गुंठ्यांच्या लोकांना बोलावता. सोमय्या ईडीच्या ऑफिसात दही खिचडी खात असतो. ईडी भ्रष्ट आहे. हे सगळे ईडीचे वसुली एजंट झालेत, हा माझा दावा आहे, असंही ते म्हणाले