Tuesday, February 27, 2024
Homeताजी बातमीविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर काँग्रेसचं आंदोलन; भाजपनेही दंड थोपटले; राड्याची शक्यता

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर काँग्रेसचं आंदोलन; भाजपनेही दंड थोपटले; राड्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्राचा अपमान केल्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेसकडून राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या घराबाहेर आंदोलने सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून सोमवारी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईतील ‘सागर’ हा बंगला देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान आहे. काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली या बंगल्याबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र, या आंदोलनावरुन भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतील आहे.

भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी थेट नाना पटोले यांना इशारा दिला होता. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर येऊनच दाखवा. तुम्ही परत कसे जाता, हे आम्ही पाहतोच, असे प्रसाद लाड यांनी म्हटले होते. त्यामुळे आज मुंबईत काँग्रेस आणि भाजपचा राडा होण्याची शक्यता आहे. पेगॅसस सॉफ्टवेअरचा वापर करुन देशातील प्रमुख व्यक्तींवर पाळत ठेवल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसकडून भाजपच्या दादर येथील वसंतस्मृती कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हादेखील काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसमाने आले होते. तर गेल्या दोन दिवसांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भागवत कराड यांच्या घराबाहेरही काँग्रेसने आंदोलन केले होते. तेव्हादेखील काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडताना दिसून आले होते.

प्रसाद लाड यांचं नाना पटोलेंना आव्हान….
नाना पटोले यांना आव्हान देताना प्रसाद लाड म्हणाले की, ‘नाना, तुझ्या आव्हानाला प्रतिआव्हान देत आहे. हिम्मत आहे का, तू उद्या सकाळी १० वाजता येऊनच दाखव, नाही तुला उलटा प्रसाद दिला तर आम्हीही भाजप कार्यकर्ते नाहीत. तू सागरवर ये, पाहतो तू कसा परत जातो ते.’

मंगलप्रभात लोढांच्याही कार्यकर्त्यांना सूचना…
पटोले यांनी आंदोलनाची घोषणा केल्यानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी नाना पटोले यांच्या स्वागतासाठी तयार राहा, अशा सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आज आंदोलन झाल्यास काँग्रेस कार्यकर्ते विरुद्ध भाजप कार्यकर्ते असा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments