९ जुलै २०२१,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,पिंपरी चिंचवड शहर जिल्हा आयोजित मोशी येथील भाषण वर्गाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.मोठ्या संख्येने महिला व पुरुष ,युवक युवती भाषण वर्गाचा लाभ घेत आहे या प्रशिक्षण वर्गास प्रा. हरिष मोरे सर हे मार्गदर्शन करणार असून प्रशिक्षण वर्गाचा कालावधी तीन महिने असून सदर वर्गाचे आयोजन नागेश्वर न्यू इंग्लिश स्कूल मध्ये केले आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे जिल्हा निरीक्षक सौ कविता संदेश आल्हाट यांनी केले आहे.प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी शहर अध्यक्ष संजोक भाऊ वघिरे , मा. नगरसेवक अरुण भाऊ बोऱ्हाडे, मा.शिक्षण सभापती विजय लोखंडे,सामाजिक कार्यकर्ते ,हिरामण सस्ते सर,मुख्याध्यापिका वैशाली आल्हाट, शहर उपाध्यक्ष अतिश बारणे,सरचिटणीस प्रकाश आल्हाट, भोसरी ओबीसी सेल अध्यक्ष अरविंद बनकर,माळीसंघ महासचिव,रवींद्र आल्हाट,शहर उपाध्यक्ष सपना घाडगे, आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोसरी विधानसभा कार्याध्यक्षा संगीता आहेर यांनी केले व पुणे जिल्हा निरीक्षक कविता ताई यांनी आभार व्यक्त केले.