Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रपत्रकारांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे तक्रार, पोलिसांकडून आमची अडवणूक

पत्रकारांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे तक्रार, पोलिसांकडून आमची अडवणूक

पिंपरी चिंचवड शहरात कोणातही मोठा नेता आला की पत्रकारांना त्या नेत्यांपर्यंत पोलीस प्रशासनाकडून पोहचू दिले जात नव्हते. त्यामुळे पत्रकारांनी थेट पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली. पत्रकारांनी होणाऱ्या त्रासाबद्दल अजित पवार यांना कल्पना दिली. त्यानंतर अजित पवार यांनी थेट पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना बोलावत थेट पत्रकारांसमोर त्यांची कानउघडणी केली.

पंधरा दिवसांपूर्वीच गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पत्रकारांनी याबाबत तक्रार केली होती. त्यावेळी फडणवीसांनी पोलिसांना या संदर्भात सूचना दिल्या होत्या. तरीही आज पुन्हा पोलिसांनी अजित पवार यांच्याकडे पत्रकार जात असताना त्यांची अडवणूक करण्यात आली. त्यामुळे अखेर पत्रकारांनी अजित पवार यांच्याकडे पोलिसांची तक्रार केली. त्यामुळे अजित पवारांनी थेट विनय कुमार चौबे यांना फैलावर घेतले.

आज सकाळी अजित पवार हे पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना माध्यम प्रतिनिधींनी घेरले आणि आपली बाजू मांडली. त्यावेळी अजित पवार यांनी बाजू समजून घेत पोलीस आयुक्तांना बोलावले. यावेळी अजित पवार म्हणाले की, “पत्रकार बांधवांची तक्रार आहे की, मी आलो अथवा कोणताही नेता आला तरी तुमच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना अडवण्यात येते. कितीही सांगितले तरी सोडले जात नाही. इथून पुढे असं होऊ देऊ नका. मीडियाच्या प्रतिनिधींना आमच्यापर्यंत येण्यापासून रोखू नका. त्यांच्याशी बोलायचे की नाही हा आमचा अधिकार आहे. मात्र, त्यांना रोखले जाऊ नये”, असं स्पष्ट शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस आयुक्तांना सांगितले.

नेमकं अजित पवार पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना काय बोलले ?

बंदोबस्तामुळे तुमचे लोक पत्रकारांना पुढे येऊ देत नाहीत. पत्रकारांना पुढे येऊ दिले पाहिजे, त्यांना थांबवू नये. आता असं होणार नाही याची काळजी घ्या. सर्व पक्षीय नेते आल्यास त्यांना त्यांचं काम करू द्या. त्यांच्याशी बोलायचं की नाही हे आमचा अधिकार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments