Wednesday, February 11, 2026
Homeमुख्यबातम्याआयुक्त शेखर सिंह यांचा कार्यकाल पूर्ण ; पण विकासकामे ठप्प – भाजपा सरचिटणीस सचिन...

आयुक्त शेखर सिंह यांचा कार्यकाल पूर्ण ; पण विकासकामे ठप्प – भाजपा सरचिटणीस सचिन काळभोर यांचा आरोप

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी):

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांचा प्रशासकीय कार्यकाळ नुकताच पूर्ण झाला आहे. मात्र, या कार्यकाळात शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, अतिक्रमण, धोकादायक इमारती, स्वच्छता, बेकायदेशीर बांधकामे आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर कार्यवाही करण्यात अपयश आल्याच्या जोरदार आरोपांमुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत असून, भाजपा पक्षाने त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

📌 पाणीपुरवठा योजना अर्धवटच

महापालिकेच्या २४ तास पाणीपुरवठा योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला, परंतु प्रत्यक्षात ही योजना कोलमडली आहे. अनेक प्रभागांमध्ये कमी दाबाचा, अनियमित पाणीपुरवठा नागरिकांना भोगावा लागत आहे. ही योजना अपूर्ण असून आयुक्तांनी अंमलबजावणीत अपयश पत्करल्याचा आरोप भाजपने केला आहे.

🛣️ रस्त्यांची चाळण – मेट्रो कामाचा फटका

निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी मुंबई-पुणे महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. खड्ड्यांनी भरलेले रस्ते, वाहतुकीतील अडथळे आणि अपघातांमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांकडून मेट्रो यंत्रणेला लेखी सूचना दिल्याचे सांगण्यात येते, परंतु अद्याप रस्ते दुरुस्तीची कार्यवाही झालेली नाही.

🏚️ धोकादायक इमारती आणि अंमलबजावणीचा अभाव

निगडी सेक्टर २२ मधील ‘नेहरू पुनर्वसन प्रकल्प’ न्यायालयीन अडथळ्यांमुळे रखडला आहे. PCMC कॉलनीमधील ९ धोकादायक इमारती आजही वापरात असून, नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत. महापालिकेच्या उदासीनतेमुळे संभाव्य दुर्घटनांचा धोका वाढत आहे.

🏗️ अतिक्रमण, बेकायदेशीर बांधकामे आणि राजकीय हस्तक्षेप

रेड झोनमधील भूखंड मोजणीसाठी कोट्यवधींचा खर्च झाला तरीही भूमापन झालेले नाही. DP आरक्षण रद्द करणे, निवडणूकपूर्व निवडक कारवाई, आणि राजकीय दबावाखाली निर्णय बदलल्याचे गंभीर आरोप आहेत. मोशी आणि कुदळवाडी परिसरात लाचखोरीची प्रकरणे समोर आली असून, आयुक्तांकडून उशिरा कारवाई झाली आहे.

🧹 स्वच्छतेचा बोजवारा, रोगराईचा धोका

शहरातील स्वच्छता, नाल्यांची सफाई आणि कचरा व्यवस्थापनात ठेकेदारांकडून हलगर्जीपणा दिसून येत आहे. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत असून, नागरिक आरोग्याच्या दृष्टीने त्रस्त आहेत. नदी सुधार प्रकल्पही अर्धवट सोडण्यात आला आहे.

🏫 ठेकेदारी शिक्षण व आरोग्य सेवा – राजकीय पोसण्याचा आरोप

महानगरपालिकेच्या शाळा आणि रुग्णालये खाजगी संस्थांना दिल्याचा आरोप होत असून, यामध्ये ठेकेदार पोसण्याचा आणि राजकीय हस्तक्षेपाचा संदर्भ भाजपने दिला आहे.

🗣️ भाजप चिटणीसांचा थेट आरोप:

शेखर सिंह यांचा कार्यकाळ अपयशाचा ठसठशीत नमुना ठरला आहेत्यांनी कोणत्याही विषयावर ठोस निर्णय घेतला नाहीत्यामुळे शहराचा विकास रखडला आहेनागरिक त्रस्त आहेतत्यामुळे अशा आयुक्तांची तात्काळ हकालपट्टी व्हावी,”

— सचिन काळभोर, चिटणीस, भाजपा, पिंपरी-चिंचवड

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments