सध्या सर्वत्र महागाईचा भडका उडालेला आहे.जीवनावश्यक वस्तूंचे दर दिवसागणिक वाढत आहेत. दुधाचे भाव 2 रुपयांनी वाढले आहेत. आजपासून हे नवे दर लागू होणार आहेत. अश्यात आता मात्र एक दिलाश्याची बातमी. आता गॅसच्या दरात मात्र कपात झालीये. सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात ६ रुपये प्रति किलो अशी कपात करण्यात आलीये. तर पीएनजीच्या दरात ४ रुपये प्रति किलो कपात झाली आहे. तिकडे पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात ४ रुपयांची कपात करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून १२ वाजल्यापासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. तसंच यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या दरात झालेल्या कपातीमुळे ग्राहकांना सीएनजी मुंबईमध्ये ८० रुपये प्रति किलो मिळणार आहे. पीएनजी ४८.५० रुपयांना मिळणार आहे. तर पुण्यात सीएनजी ८७ रुपये प्रतिकिलो दराने मिळणार आहे.
सीएनजीच्या दरात घट
गॅसच्या दरात मात्र कपात झालीये. सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात सहा रुपये प्रति किलो अशी कपात करण्यात आलीये. तर पीएनजीच्या दरात चार रुपये प्रति किलो कपात झाली आहे. तिकडे पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात चार रुपयांची कपात करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून १२ वाजल्यापासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. तसंच यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.