21 November 2020.
कॉमेडियन भारती सिंहच्या घरी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापा टाकला आहे.
बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करणार्या नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने शनिवारी प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी छापा टाकला.
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नी दोघांवरही ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप आहे.
ड्रग्जच्या पेडलर्सकडून गुप्त माहिती मिळाल्यानंतर टीव्ही अभिनेत्री आणि कॉमेडियनच्या भारती सिंहच्या घरी एनसीबीने रेड टाकली आहे.
भारती सिंहच्या मुंबईमधील घरात मादक पदार्थ सापडल्याची माहिती पुढे येत आहे. एनसीबीने अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा भागात धाड टाकली.