Saturday, March 2, 2024
Homeताजी बातमीफ्रिडम टू वॉक अँड सायकल चॅलेंज फॉर सिटी बाबतच्या शपथेचे आयुक्त राजेश...

फ्रिडम टू वॉक अँड सायकल चॅलेंज फॉर सिटी बाबतच्या शपथेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडून सामुहिक वाचन…

पर्यावरणपूरक जीवनमान जगणे हा आधुनिक जीवनाचा मंत्र आहे. यासाठी आपण शहर स्वच्छतेचा संकल्प करत आहोत. या संकल्पपूर्तीसाठी प्रत्येकाने सहभाग घ्यावा, कच-याचे वर्गीकरण करावे तसेच वसुंधरेला स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त आणि सुजलाम-सुफलाम बनविण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

केंद्र शासनाच्या शहर विकास मंत्रालयामार्फत आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमा अंतर्गत देशातील विविध शहरामधील नागरिकांना दैनंदिन वापरासाठी सवय लागण्याच्या दृष्टीने सायकलींग, वॉकिंगसाठी प्रोत्साहित करण्यासाठी पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनाच्या आवारामध्ये फ्रिडम टू वॉक अँड सायकल चॅलेंज फॉर सिटी बाबतच्या शपथेचे सामुहिक वाचन करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त पाटील बोलत होते. सध्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ च्या माध्यमातून महापालिकेतर्फे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये महापालिका अधिकारी कर्मचा-यांचा सक्रीय सहभाग असणे गरजेचे आहे. यादृष्टीने हरित शपथ आणि स्वच्छता शपथेचेही यावेळी सामुहिक वाचन करण्यात आले

यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, श्रीकांत सवने, संदेश चव्हाण, मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्त राजेश पाटील म्हणाले, जगातील विकसित देशांमध्ये साधारणपणे ४० टक्के लोक दैनंदिन कामासाठी सायकलचा वापर करतात. शिवाय विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने सायकलला प्राधान्य देतात, ही त्या देशांची खासियत आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी मदत होते.इंधनावर चालणा-या वाहनांच्या वाढत्या वापरामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. यामुळे पर्यावरणाची हानी होत असून संपूर्ण जीवसृष्टीलादेखील धोका उत्पन्न होतो. वाहतुकीचे प्रमाण वाढल्याने अपघाताची शक्यता असते. या गोष्टींचा आपण देशातील एक सुजाणव जबाबदार नागरिक या नात्याने विचार करणे गरजेचे आहे. भारत देशाने विकासाकडे झेप घेतली असून आपल्याही देशातील नागरिकांनी सायकलचा वापर जास्तीत जास्तकेल्यास व्यायाम होईल, परिणामी प्रदूषण कमी होण्यासाठी आपले योगदान राहील. दररोज चालणे आणि सायकल चालवणे हा आपल्या शरीरासाठी सर्वोत्तम व्यायाम आहे, असे आयुक्त राजेश पाटील यावेळी म्हणाले.

शहराचा विकास होत असताना जगण्यासाठी आणि राहण्यासाठी उत्तमोत्तम शहर होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.यामध्ये आपल्या शहराला सर्वोत्तम शहर बनवण्यासाठी आपले प्रयत्न आघाडीवर असले पाहिजे. पिंपरी चिंचवड शहराला देशातील प्रथम क्रमांकाचे सुंदर आणि स्वच्छ शहर बनवण्याचा आपण विडा उचलला आहे. शहरातील फुटपाथवर नागरिकांना चालता आले पाहिजे. शिवाय शहरात कोठेही सहजपणे सायकलवर जाता आले पाहिजे. त्यादृष्टीने रस्ते विकसित करून स्वतंत्रपणे सायकल मार्ग करण्याचे करण्याचे नियोजन केले जात आहे. पिंपरी चिंचवड शहराला देशातील सर्वात स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त शहर बनविण्यासाठी तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि निरोगी सदृढ आयुष्यासाठी सायकलचा वापर करावा असे आवाहन आयुक्त पाटील यांनी यावेळी केले.

सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी हरित शपथेचे तर उपआयुक्त संदीप खोत यांनी स्वच्छता शपथेचे वाचन केले. फ्रिडम टू वॉक अँड सायकल चॅलेंज फॉर सिटी लीडर्स शपथपत्राचे वाचन कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments