Wednesday, May 20, 2026
Homeताजी बातमीचिंचवड विधानसभा मतदारसंघात छायचित्र नसलेल्या मतदारांचे छायचित्र गोळा करण्यासाठी येत्या शनिवारी आणि...

चिंचवड विधानसभा मतदारसंघात छायचित्र नसलेल्या मतदारांचे छायचित्र गोळा करण्यासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी विशेष शिबिराचे आयोजन

१ जूलै २०२१,
मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र अद्यावातीकरण करणे कार्यक्रम घोषित केला आहे. २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या एकूण ४९१ यादी भागामधील ७ हजार ६९६ मतदारांची छायाचित्र मतदार यादीमध्ये दिसून येत नाहीत. छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या नावांची यादी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची दूरध्वनी क्रमांकासहित यादी जिल्हाधिकारी पुणे www.pune.nic.in व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या Website वर माहितीकरिता व संपर्काकरिता उपलब्ध केलेले आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या एकूण ४९१ यादी भागामधील ७ हजार ६९६ मतदारांची छायाचित्र मतदार यादीमध्ये दिसून येत नाहीत. छायचित्र नसलेल्या मतदारांचे छायचित्र गोळा करण्यासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यादीत छायाचित्र नसलेल्या नागरिकांनी आपले छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी स्मिता झगडे यांनी केले आहे.

ज्या मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नाहीत. त्यांनी त्यांचे अलीकडच्या काळातील 2 रंगीत छायचित्र छायाचित्र व रहिवास पुराव्यासह (लाईट बिल, गॅस पुस्तक, राष्ट्रीयकृत बँकेचे खातेपुस्तक, पासपोर्ट इ) 205 चिंचवड विधानसभा मतदार संघाचे कार्यालय यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, दुसरा मजला, ग क्षेत्रीय कार्यालय थेरगाव येथे समक्ष अथवा शनिवार आणि रविवारी होणाऱ्या छायचित्र नसलेल्या मतदारांचे छायचित्र गोळा करण्याचे विशेष शिबिरात मतदान केंद्रावर संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावे.

ज्या मतदारांची या कालावधीत रहिवास पुरावा व छायाचित्र जमा होणार नाहीत. त्यांची नावे मतदार यादीतून वगळणी करण्याबाबतची पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार आहे. तसेच 1 जानेवारी 2021 नंतर ज्या मतदारांनी नावनोंदणी केलेली आहे. अशाच मतदारांचे मतदान ओळखपत्र वाटप मतदान केंद्रावर केले जाईल. शिबिर हे केवळ 491 यादीभागांमध्ये असलेल्या मतदारांसाठी मर्यादित आहे. इतर यादीभागातील छायाचित्र नसलेल्या मतदारांसाठी स्वतंत्र शिबिर यानंतर आयोजित करण्यात येईल.

कोविड 19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता इतर कोणत्याही मतदान केंद्रव्यतिरिक्त इतर मतदान केंद्रातील किंवा 1 जानेवारी 2020 पूर्वी मतदार नावनोंदणी केलेल्या मतदारांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीकरिता कोमल टिके 8830511215 आणि अमर कांबळे 7020787881 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

२०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ 
यादी भाग क्र.BLO  यांचे नाव मोबाईल क्र.विशेष शिबीर आयोजित केलेले मतदान केंद्र मतदान केंद्र परिसर 
५९श्री ढगे बाळासाहेब रामभाऊ 9130338855गुरुमैय्या प्राथमिक विद्यालय, चिंचवडेनगर, दक्षिण उत्तर इमारत, तळ मजला, दक्षिणेकडून खोली क्रमांक २वाल्हेकरवाडी
८०श्री. परब सचिन सुरेश9860574727गुरु गणेश बालक मंदीर व सेठ रतीलाल गोसलीया शिशूविहार चिंचवड गेट क्र.1 उत्तर दक्षिण पश्चिममुखी  दगडी इमारत दक्षिणेकडून खोली नं.५चिंचवडगाव
८३श्री लोहार राजेश लालासाहेब 9552808016गुरु गणेश बालक मंदीर व सेठ रतीलाल गोसलीया शिशूविहार चिंचवड गेट क्र.1 उत्तर दक्षिण पश्चिममुखी दगडी इमारत दक्षिणेकडून खोली नं.८चिंचवडगाव
८५श्री फंड विनोद 9890277428गुरु गणेश बालक मंदीर व सेठ रतीलाल गोसलीया शिशूविहार चिंचवड गेट क्र.1 उत्तर दक्षिण पश्चिममुखी दगडी इमारत दक्षिणेकडून खोली नं.१०चिंचवडगाव
९३श्रीमती. बंब सुषमा अनिल 9921337268फत्तेचंद जैन विद्यालय व ज्यू.कॉलेज चिंचवड गेट क्र. २ पूर्व-पश्चिम इमारत, उत्तराभिमुखी, पश्चिमेकडून  खोली नं. १ (ए १०१) चिंचवडगाव
९४श्री. शिरसाठ ए.जे.9762206331फत्तेचंद जैन ज्युनिअर कॉलेज गेट क्र.४, पूर्व पश्चिम इमारत, पश्चिमाभिमुखी, पूर्वेकडून खोली नं. १चिंचवडगाव
९७श्रीमती.नलवडे मेघा विजय 8007100017फत्तेचंद जैन ज्युनिअर कॉलेज गेट क्र.४, पूर्व पश्चिम इमारत, उत्तराभिमुखी, पूर्वेकडून खोली नं. २चिंचवडगाव
१०१श्रीमती. हिरवे विश्वा सुनील 9765231414शिक्षण प्रसारक मंडळ न्यू इंग्लिश स्कूल, चिंचवड, दक्षिण उत्तर इमारत, दक्षिणेकडील,  खोली क्र. २चिंचवडगाव
१२४श्रीमती.समुर्द्रे शर्मिला अरविंद 7887828825पि.चिं.म.न.पा. मुलामुलींची शाळा, केशवनगर, चिंचवड, दक्षिण उत्तर नवीन इमारत, पूर्वाभिमुखी, तळमजला, उत्तरेकडून खोली क्र. २केशवनगर
१५२श्रीम.चोपडे सुमंगला सुनिल 9960492377अल्फान्सा हायस्कूल, विजयनगर, काळेवाडी, दक्षिण उत्तर इमारत, पूर्वाभिमुखी, तळमजा दक्षिणेकडून खोली क्र. १ (Activity Room)विजयनगर काळेवाडी
१५३श्री. जाधव हनुमंत रमेश 8390022224बी.टी.मेमोरीयल इंग्लिश मिडियम स्कुल (ओम सेन्टस हायस्कुल), दक्षिण उत्तर इमारत, तळमजला, दक्षिणेकडून खोली क्र. १काळेवाडी
१५५श्रीम.कदम सुनंदा दिगंबर 9730253950बी.टी.मेमोरीयल इंग्लिश मिडियम स्कुल (ओम सेन्टस हायस्कुल), दक्षिण उत्तर इमारत, तळमजला, दक्षिणेकडून खोली क्र. ३काळेवाडी
२०८श्रीमती. वाडेकर अनिता एम 8087993569विद्यादिप शिक्षण संस्था, ताईबाई राजवाडे पूर्व प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, (माने हायस्कूल राजवाडे नगर, काळेवाडी)  दक्षिण उत्तर इमारत, पश्चिमाभिमुखी, तळमजला, दक्षिणेकडून खोली क्र. २काळेवाडी
२२५श्री.कांडेकर नानाभाऊ तात्याबा 9850778911दि न्यु मिलीनियम इंग्लिश मिडीयम स्कुल, थेरगांव, (किर्तीनगर) तळमजला खोली क्र. ६किर्तीनगर थेरगाव
२४०श्रीमती.रोडगे स्मिता मारोतराव 9511716261नागु बारणे प्राथमिक शाळा मुलामुलींची ६०/२, संतोष नगर, थेरगांव, पूर्व पश्चिम इमारत, उत्तराभिमुखी, तळ मजला खोली क्रमांक २संतोषनगर थेरगाव
२४५श्रीमती.यादव साधना हरिचंद्र 8888562276लक्ष्मीबाई धाईंजे विद्यालय, गुजरनगर, थेरगाव, दक्षिण उत्तर इमारत, पश्चिमुखी तळमजला, दक्षिणेकडून खोली नं ४संतोषनगर थेरगाव
३५३श्रीमती. राऊत संजीवनी सोमकांत 9921716328पिं.चिं. मनपा मुलामुलींची शाळा क्र.  ५४/१ पिंपळेगुरव, नविन इमारत क्र. १, तळमजला खोली क्र. १०  (प्रवेशद्वाराच्या डावीकडील विंग)पिंपळेगुरव
३६०श्री.कमलाकर शैलेश भिमराव9762106278पिं.चिं. मनपा मुलामुलींची शाळा क्र.  ५४/२ पिंपळेगुरव, नविन इमारत क्र. २, तळमजला खोली क्र. ७ (प्रवेशद्वाराच्या उजवीकडील विंग)पिंपळेगुरव
४२९श्रीमती.पोळ उषा शिवाजी 7038824899यशवंत धोंडिबा टण्णू प्राथ.विद्यालय, नवी सांगवी, (शांतीदेवी जयसिंग हुजा गुरूनानक हायस्कूल, सांगवी), दक्षिण उत्तर इमारत, पूर्वाभिमुखी, दक्षिणेकडून खोली क्र.४नवी सांगवी
४३१श्री. मेमाणे संजय श्रीपती 9420864284बाबुरावजी घोलप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नवी सांगवी, जुनी इमारत नं.1 पुर्वाभिमूखी  दक्षिणउत्तर इमारत तळमजला दक्षिणेकडुन खोली क्रमांक2नवी सांगवी
४४०श्री. भुजबळ महेंद्र मंजाबा 9822470155बाबुरावजी घोलप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नवी सांगवी, नवीन दक्षिण उत्तर इमारत उत्तराभिमूखी, तळमजला उत्तरेकडुन जीवशास्त्र प्रयोगशाळानवी सांगवी
४५३श्री.उदावंत कैलास वसंत 9823265254नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सांगवी, पूर्व पश्चिम, उत्तराभिमुखी, तळमजला, पश्चिमेकडून खोली क्र. २सांगवीगाव
४६२श्री. खांदवे संजय दत्तात्रय 9822258269नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मधुबन कॉलनी, गल्ली क्र. १,तळ मजला, डावीकडून खोली क्र. ३सांगवीगाव
४६८श्रीमती चित्ते कविता उत्तम9552517701पिं.चिं. मनपा शाळा क्र. ४९ सांगवी, पूर्व पश्चिम, पूर्वाभिमुखी, तळ मजला, पूर्वेकडील विरंगुळा केंद्राची खोलीसांगवीगाव
RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments