Thursday, September 28, 2023
Homeआरोग्यविषयकराज्यात सर्वत्र थंडीचा कडाका पुन्हा वाढला, पुण्यात नीचांकी तापमानाची नोंद

राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका पुन्हा वाढला, पुण्यात नीचांकी तापमानाची नोंद

७ डिसेंबर २०२०,
राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका पुन्हा वाढला असून रविवारी राज्यातील नीचांकी १०.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद पुण्यात झाली. किमान तापमानाप्रमाणे कमाल तापमानातही अंशतः घट झाल्याने शहरात दिवसभर गारवा जाणवत होता. डिसेंबर सुरू होताच, शहरातील गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारपर्यंत शहरातील किमान तापमान १६ अंशांच्या दरम्यान होते. त्यात गेल्या दोन दिवसांत मोठी घट झाली आहे. शनिवारी पारा ११ अंशांच्या दरम्यान स्थिरावला होता; पण रविवारी त्यात आणखी घसरण झाली.

राज्यातील सर्वांत कमी तापमानाची नोंद पुणे वेधशाळेत झाली असून सकाळी दहापर्यंत बोचऱ्या वाऱ्यांचा अनुभव नागरिकांनी घेतला. शहरात किमान तापमानाप्रमाणे कमाल तापमानही तीस अंशांच्या खाली घसरले आहे. त्यामुळे दिवसभर हवेत गारवा पसरला होता. दिवाळीपूर्वी नोव्हेंबरच्या सुरुवातीला शहरात कडाक्याची थंडी पडली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा किमान तापमानात वाढ झाली. दिवाळीनंतर एक-दोन दिवस पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली.

पुण्यासह राज्याच्या इतर अनेक शहरांमध्येही किमान तापमानात घट झाली आहे. नाशिक (१०.६ अं. से.) आणि परभणी (१०.८ अं. से) येथेही किमान तापमानात बरीच घट झाली आहे. तर, विदर्भामध्येही बहुतेक शहरांमध्ये तापमान १५ अंशांपेक्षा कमीच आहे. पुढील दोन दिवसांतही राज्यातील हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments