Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीपुण्यात गारठा वाढला...

पुण्यात गारठा वाढला…

२ जानेवारी २०२०,
कडाक्याच्या थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणेकरांनी नवीन वर्षाच्या स्वागताच्या वेळी गेल्या दोन महिन्यांतील सर्वाधिक गारठा अनुभवला. पुण्यात बुधवारी १०.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आणि या हिवाळ्यातील हे नीचांकी तापमान ठरले.
मध्य महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात पावसानेही हजेरी लावली होती. डिसेंबरचा शेवटचा आठवडा आला तरी पुणेकर दिवसा उकाडा, दुपारनंतर पाऊस आणि रात्री गारवा असे तीन ऋतू अनुभवत आहेत. पण नवीन वर्षाच्या पहिल्याच मध्यरात्री राज्याच्या बहुतांश भागात तापमानात लक्षणीय घट झाली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रात्री फिरायला गेलेल्ला नागरिकांना घरी परताना हुडहुडी भरली. पुण्यात बुधवारी दिवसभरात किमान १०.८ अंश सेल्सिअस, तर कमाल ३० अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सकाळी गार वारे वाहत असल्यामुळे लवकर घराबाहेर पडलेले नागरिक स्वेटर, मफलर घालून फिरताना दिसले. कमाल तापमानात वाढ झाल्याने दिवसा थंडी जाणवली नाही. गेल्या वर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातील तापमानाचा पारा ५.९ अंशापर्यंत खाली घसरला होता. या वर्षी डिसेंबरच्या शेवटच्या दिवशीही लोक ढगाळ हवा कधी दूर होणार, याच प्रतीक्षेत होते. पुणेकरांची बुधवारची सकाळ आल्हाददायक झाली. पुढील दोन दिवस किमान तापमानात घट कायम राहील आणि कमाल तापमानात किंचित घट होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments