Monday, July 15, 2024
Homeभारतआज पुण्यात होणाऱ्या भारत आणि बांगलादेश सामन्यात नाणेफेक ठरणार महत्त्वाची ….

आज पुण्यात होणाऱ्या भारत आणि बांगलादेश सामन्यात नाणेफेक ठरणार महत्त्वाची ….

विश्वचषक २०२३ मध्ये आज पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना रंगणार आहे. पुण्याची खेळपट्टी फलंदाजांसाठी नेहमीच चांगली मानली जाते आणि या मैदानात उच्च धावसंख्येचे सामने पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत प्रेक्षकांना पुन्हा एकदा उच्चांकी सामन्याची अपेक्षा असेल. कसं असेल पिच आणि नाणेफेक जिंकल्यावर संघ प्रथम काय निवडणार, जाणून घ्या.

भारत आणि बांगलादेश सामन्यात नाणेफेकही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. पुण्याच्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकल्यानंतर दोन्ही संघांना प्रथम फलंदाजी करायची आहे. या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या ३०७ धावांची आहे.

या मैदानावर ७ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ४ आणि धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ३ सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत आज नाणेफेक जिंकून दोन्ही संघांना प्रथम फलंदाजी करायची आहे. या मैदानावर भारतीय संघाने २०१७ साली इंग्लंडविरुद्धची सर्वात मोठी धावसंख्या केली होती. त्यावेळी टीम इंडियाने ७ विकेट गमावून ३५६ धावा केल्या होत्या.

पुण्यातील टीम इंडियाची आकडेवारी

भारतीय संघाने २०१३ पासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या खेळपट्टीवर ७ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यापैकी चार जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत. आता या मैदानावर भारतीय संघ विजयाची हॅट्ट्रिक करू शकतो कारण टीम इंडियाने पुण्याच्या खेळपट्टीवर आपले शेवटचे दोन सामने जिंकले आहेत.

विश्वचषक २०२३ मध्ये दोन्ही संघांची कामगिरी

या विश्वचषकात आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये ३-३ सामने खेळले गेले आहेत, ज्यात एकीकडे भारतीय संघाने तिन्ही सामने जिंकले आहेत, तर दुसरीकडे बांगलादेशने तीनपैकी केवळ एकच सामना जिंकला आहे आणि दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.. या विश्वचषकात भारताने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला पराभूत केले आहे. बांगलादेशने अफगाणिस्तानविरुद्धचा एकमेव सामना जिंकला आहे, तर इंग्लंड आणि न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments