पुण्यात गुरुवारपासून CNG दरात 6 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यापासूनची ही सातवी दरवाढ आहे. 91 रुपये प्रति किलोने पुण्यात सीएनजी विकला जात आहे.पेट्रोलच्या दरात 8 पैशांनी आणि डिझेलच्या 7 पैशांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच देशांतर्गत ड्रिल केलेल्या वायूच्या स्रोतातील नैसर्गिक वायूच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर या किंमतीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
रशिया आणि युक्रेनकडून पुरवठा होत नसल्याने सीएनजी गॅसचा तुटवडा आहे, त्यामुळे सीएनजीच्या दरांवर परिणाम होत आहे. काही वायू युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाकडून खरेदी केला जात आहे, ज्यामुळे भारतातही टंचाई निर्माण होत आहे. भविष्यात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे दर कमी होतील, असं ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन (एआयपीडीए) तर्फे सांगण्यात आलं आहे.
यापूर्वी मुंबईत सीएनजीचे दर 12 जुलै रोजी वाढले होते. त्यावेळी सीएनजीच्या दरात 4 रुपयांची वाढ तर पीएनजीच्या दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती. तसेच, त्यापूर्वी 29 एप्रिल रोजीही दरांत वाढ करण्यात आली होती. सीएनजीच्या दरात चार रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा सीएनजीच्या दरांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. सीएनजीच्या दरांत सातत्यानं होणाऱ्या वाढीमुळे सीएनजीच्या किमती आता पेट्रोलच्या किमतींशी स्पर्धा करतात की, काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.