सर्व्हेक्षणात आरोग्य विभागाचा खरी कसोटी
५ जानेवारी २०२०,
स्वच्छ शहर अतंर्गत सर्वेक्षण येत्या सोमवारपासून प्रारंभ होणार आहे. यापुर्वी पिंपरी चिंचवड शहरात दोन लीग पूर्ण केल्या असून पहिल्या लीगसाठी शहराने सहावा क्रमांक तर दुसर्यावेळी चौदाव्या क्रमांक मिळविला. पण आता प्रत्येक्षात स्वच्छ सर्वेक्षणास प्रारंभ होणार असून आरोग्याचे अधिकारी कामाला लागले आहेत. केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी स्वच्छ शहर सर्वेक्षण अभियान राबविले जाते. यंदा या सर्वेक्षणासाठी महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घातले आहे. गतवर्षी चुका सुधारुन शहर स्वच्छ सर्वेक्षणास सहभागी होणार आहे. स्वच्छ शहर सर्वेक्षणाला सहा हजार गुण असून यामध्ये किती गुण मिळतात यावरुन शहर स्वच्छतेचा क्रमांक ठरविला जाणार आहे.
एक हजार गुणांचे रेटींग…
पंधराशे गुणांची शहरवासियांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातात. त्यानंतर पंधराशे गुणांची पाहणी केली जाते. एक हजार गुणांचे रेटिंग असते. पाचशे गुण ऍप डाऊनलोडसाठी असतात. दोन हजार पैकी गुण शहराला दिले जातात. स्वच्छ सर्वेक्षणाच्या पहिल्या लीगमध्ये 1409 गुण मिळून शहराचा सहावा क्रमांक आला होता. तर दुसर्या लीगमध्ये 1369 गुण मिळून चौदावा क्रमांक आला. आता तिसर्या लीगमध्ये चांगली कामगिरी दाखवत शहराचा प्रथम क्रमांक आणण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे.
दोन लाख हॅन्डबील वाटप…
महापालिका आरोग्य विभागाने शहरभर जनजागृती केली आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2020 नियोजन करुन त्याची माहिती नागरिकांना दिली जात आहे. जनजागृतीसाठी आतापर्यंत दोन लाख हॅन्डबील वाटप केले आहेत. शहरभर बॅनर, सोशल मीडियातून नागरिकांपर्यंत प्लॅस्टिकबंदी, ओला व सुका कचरा विलगीकरणाचे संदेश दिले आहेत. स्वच्छ सर्वेक्षणसाठी पुढील आठवड्यामध्ये पथक शहर पाहणीस येणार असून त्यानूसार आरोग्य विभागाने तयारी केली आहे.
स्वच्छ शहर सर्वेक्षणासाठी महापालिका सज्ज आहे. स्वच्छतेबाबत शहराला चांगला क्रमांक मिळावा यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. गतवर्षी सर्वेक्षणासाठी फक्त एकच प्रभाग घेतला होता. यावर्षी संपूर्ण प्रभागांमध्ये सर्वेक्षण केले जाणार आहे. यामुळे जबाबदारीही वाढलेली असून नागरिकांनीही शहर स्वच्छ व सुंदर करण्यास प्रयत्नशिल राहणे अपेक्षित आहे.
– डॉ. के.अनिल रॉय, आरोग्य वैद्यकिय अधिकारी