स्वच्छ सर्वेक्षण २०२३ करिता आपणा सर्वांच्या सहकार्यांने आणि सहभागातून महापालिका मार्गक्रमण करीत असून येत्या काळात महानगरपालिका मानांकनात निश्चितच यशस्वी होईल असा निर्धार आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केला.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने “वर्ल्ड टॉयलेट डे” निमित्त रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथील कार्यक्रमात “स्वच्छ सुरक्षित शौचालय थर्टी डेज” या मोहिमेचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सह शहर अभियंता रामदास तांबे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, सोनम देशमुख, शितल वाकडे, विजयकुमार थोरात,राजेश आगळे, सिताराम बहुरे, क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आरोग्य अधिकारी, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, मुख्य आरोग्य निरीक्षक, बचत गटांचे पदाधिकारी, महिला मंडळ पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी, शिक्षक, पर्यवेक्षक, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमात उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या उत्तम थोरात,विनोद वानखेडे,स्वप्निल भंडारे,निलेश आंभोरे, नितीन वाघमारे,प्रशांत जगताप, दीपक शेंडगे या सफाई कर्मचाऱ्यांचा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांना देखील प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.त्यामध्ये दापोडी येथील सावित्री महिला बचत गट, रमाई महिला बचत गट , फुगेवाडी येथील प्रेरणा महिला मंडळ ,पिंपळे गुरव येथील संकल्प महिला मंडळ यांना तर नवी दिशा उपक्रमाअंतर्गत ऐश्वर्या बचत गट , जाई जूई महिला बचत गट ,जिजाऊ महिला बचत गट, प्रगती महिला बचत गट , स्वविकास महिला विकास बचत गट , नवी दिशा महिला बहुउदेशीय मंडळ,यांना तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या समन्वयक वैशाली लगडे यांचा देखील प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
लोकमान्य हॉस्पिटल शेजारी चिंचवड येथील सार्वजनिक शौचालयाचे त्याचप्रमाणे ”माय टॉयलेट ॲप” चे आणि टॉयलेट वरील भिंती चित्राचे अनावरण आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर “वर्ल्ड टॉयलेट डे” निमित्त लोकमान्य हॉस्पिटल पासून रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह पर्यंत भव्य पदयात्रा काढण्यात आली होती यामध्ये आयुक्त शेखर सिंह यांच्यासह अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.
महानगरपालिकेच्या वतीने काही बचत गटाना प्रायोजिक तत्वावर सामुदायिक शौचालय स्वच्छता व देखभाल दुरुस्तीचे कामाचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते देण्यात आले त्यामध्ये उन्नती महिला बचत गट, महात्मा फुले नगर, सिद्धार्थ नगर दापोडी येथील प्रगती महिला बचत गट, , फुगेवाडी येथील श्रावस्ती महिला बचत गट, महात्मा फुले नगर येथील धम्मशील महिला बचत गट चंद्रमणी नगर येथील आरंभ आणि प्रारंभ महिला बचत गट यांना कामाचे आदेश देण्यात आले.
दापोडी येथील सुरेखा दौडमणी यांनी बोलताना कुष्ठरोगी असल्याने कोणी हात लावत नव्हते परंतु आम्हास महानगरपालिकेने मदतीचा हात देऊन रोजगार उपलब्ध करून दिला त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत असे सांगून त्यांनी कृतज्ञतापूर्वक महापालिकेचे आभार मानले. ऐश्वर्या बचत गट महिला बचत गटाच्या राजश्री वैशाली तसेच सावित्रीबाईंना बचत गटाचे अध्यक्ष सरिता गायकवाड यांनी देखील महानगरपालिकेच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल बोलताना स्वच्छता सर्वांनी जोपासली पाहिजे तरच शहर स्वच्छ होईल असे सांगून सर्वाना स्वच्छतेचे आवाहन केले.महिला बचत गटांना सामुदायिक शौचालय स्वच्छता व देखभाल दुरुस्तीचे कामासाठी महानगरपालिकेकडून सुविधा पुरविल्या जातील असे आयुक्त शेखर सिंह म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांनी केले, सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी तर आभार विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी मानले.