Saturday, March 2, 2024
Homeताजी बातमीपुणे महापालिकेच्या हद्दीतील आठवी ते बारावीचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार…

पुणे महापालिकेच्या हद्दीतील आठवी ते बारावीचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार…

३० सप्टेंबर २०२१,
पुणे महापालिकेच्या हद्दीतील आठवी ते बारावीचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे दीर्घकाळापासून घरी असलेल्या, ऑनलाइन शिक्षणाला कंटाळलेल्या, प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा असलेल्या विद्यार्थी, पालक, शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीनेच सुरू करावे लागले. दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यावर करोना संसर्ग नसलेल्या भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली. त्यानुसार पुणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र ऑनलाइन शिक्षणातील अडचणींमुळे, ऑनलाइन शिक्षणाचा मुलांवर होणाऱ्या परिणामांमुळे शाळा सुरू करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग आणि ग्रामीण भागातील पाचवीपासूनचे वर्ग सुरू

करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता पुणे महापालिके च्या हद्दीतील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत.महापालिके चे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक म्हणाले, की ४ ऑक्टोबरपासून शहरातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना महापालिके कडून जाहीर केल्या जातील.

पिंपरीत मान्यतेसाठी प्रस्ताव आयुक्तांकडे

शहरातील महापालिका आणि खासगी शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने महापालिका स्तरावर नियोजन सुरू आहे. आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही के ली जाईल, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिके च्या शिक्षण विभागाचे सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंढे यांनी दिली.

वर्ग सुरू करण्याबाबत सूचना

पुणे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यासाठीच्या नियोजनासंदर्भातील सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत. त्यात शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार शाळांची स्वच्छता आणि र्निजतुकीकरण, मोफत पाठय़पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. त्याशिवाय सर्व शिक्षक आणि शिक्षके तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाल्याबाबत खात्री करावी. के ंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांनी १ ऑक्टोबपर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन शाळा सुरू करण्याबाबत सर्व पूर्वतयारी झाल्याची खात्री करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments