Friday, June 13, 2025
Homeताजी बातमीकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर शहर भाजपाचे जोडे मारो आंदोलन..

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर शहर भाजपाचे जोडे मारो आंदोलन..

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी नावाच्या व्यक्ती बद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी चांगलंच राजकारण तापलं आहे. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पटोले यांचा चांगलाच समाचार घेतलाय. त्यांनी पटोले यांना एकेरी भाषा वापरत वाभाडे काढले आहेत. “पटोले यांना डांबरी रस्त्यावर आणून तुडवून काढू, त्याला त्याची जागा दाखवू,” अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केलाय. यावेळी, त्यांनी नाना पटोले यांच्या फलकावरील फोटोला जोडे मारून निषेध नोंदवला.

यावेळी महापौर माई ढोरे म्हणाल्या की, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेले भाष्य हे निंदनीय आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांना एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणं शोभत नाही. त्यांना मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीची किंमत कळत नसेल तर ते काँग्रेसचे अध्यक्ष करण्याच्या लायकीचे नाहीत. काँग्रेस पक्ष अशा नालायक लोकांना अध्यक्ष करून माणसाच्या अंगावर कुत्र्यासारखे सोडत असतील, तर ते अशोभनीय आहे,”

मोरवाडी येथील पिंपरी-चिंचवड भाजपा जनसंपर्क कार्यालयासमोर मंगळवारी भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, महापौर उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, बाबू नायर, राजू दुर्गे, विजय फुगे, नगरसेवक तुषार हिंगे, सागर गवळी, कुंदन गायकवाड,अनुराधा गोरखे,शर्मिला बाबर, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, उपाध्यक्ष प्रकाश जवळकर ,नंदू दाभाडे, समीर जावळकर, किसन बावकर शहर चिटणीस अनिल लोंढे, अर्जुन ठाकरे, शांताराम भालेकर, राधिका बोर्लीकर, हिरेन सोनवणे, विशाल वाळुंजकर, नंदू कदम, आशा काळे, सचिन राउत, युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, युवा मोर्चा सरचिटणीस तेजस्विनी कदम, युवा मोर्चा प्रदेश सदस्य अजित कुलथे, शिवराज लांडगे, मुक्ता गोसावी, सागर घोरपडे, प्रकाश चौधरी, विक्रांत गंगावणे, अनिकेत शेलार, दिव्यांग सेल अध्यक्ष शिवदास हंडे, मंडल अध्यक्ष राजेंद्र लांडगे,विजय शिनकर,गुजराथी सेल अध्यक्ष मुकेश चुडासमा,ओबीसी सेल पश्चिम महाराष्ट्र संयोजक वीणा सोनवलकर,व्यापारी आघाडी सरचिटणीस सतपाल गोयल, मंडल सरचिटणीस नंदू भोगले, आबा मोरे, माजी नगरसेवक बाळासाहेब भुंबे, सहकार आघाडी अध्यक्ष प्रदीप बेंद्रे, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश चिटणीस कोमल शिंदे, ओबीसी सेल सरचिटणीस कैलास सानप,अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष फारूक इनामदार आदी उपस्थित होते.

मुर्दाबाद…मुर्दाबाद.. नाना पटोले मुर्दाबाद… अशा घोषणा यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी दिल्या. भंडारा येथील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. ‘‘आपण मोदीला मारुही शकतो व शिव्याही देवू शकतो…’’ असे वादग्रस्त विधान केल्यामुळे पटोले यांच्याविरोधात संपूर्ण राज्यात भाजपाकडून संताप व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments