Wednesday, July 15, 2026
Homeआंतरराष्ट्रीयशहरातील नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाला संपर्क...

शहरातील नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा – राजेश पाटील

पिंपरी चिंचवड शहरातील कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेन देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी नवी दिल्ली येथे मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

नवी दिल्ली येथील मदत कक्ष केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्ली, टोल फ्री क्र. 1800118797दूरध्वनी क्र. 011-23012113 / 23014105 / 23017905, फॅक्स 011-23088124 ई मेल situationroom@mea.gov.in

पुणे जिल्ह्यातील नागरिक किंवा विद्यार्थ्यांची माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे दूरध्वनी 020-26123371, ई मेल controlroompune@gmail.com

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments